Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यात वडील गमावले, आता चिमुकला लेक म्हणतोय 'मला सैन्यात घ्या मी त्यांचा...'

या पुढच्या काळात भरपूर अभ्यास करणार आणि भारतीय सैन्यात दाखल होणार. आपल्याला पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांशी लढायचे आहे असं ही तो म्हणाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ओडीसाच्या प्रशांत सतपथी यांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. या दहशतवादी हल्ल्यात तनुज कुमार सतपथी याने आपल्या वडीलांना गमावलं. या तनुज अवघ्या नऊ वर्षाचा आहे. तो पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छितो. तशी इच्छा त्याने बोलून दाखवली आहे. सैन्यात जावून आपण दहशतवाद्यांचा खात्मा करू असं ही त्याला वाटतं.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील आपल्या घरी तनुज पत्रकारांबरोबर बोलत होता. जर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळाली तर एक गोष्ट आपण त्यांना नक्की सांगू.  त्याच्यासारख्या कोणत्याही मुलाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवणार नाही याची काळजी घ्या असं पंतप्रधानांना सांगेन असं तो म्हणाला.  मी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सैन्याने माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. असं ही त्याने स्पष्ट केलं. तनुजने ‘ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले, आम्ही बुधवारी सकाळपासून बातम्या पाहत आहोत. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. शेवटी आपल्या सैन्याने बदला घेतला आहे. हे सर्व पाहून आपली सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्याचं ही त्याने सांगितलं.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र' काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ

या पुढच्या काळात भरपूर अभ्यास करणार आणि भारतीय सैन्यात दाखल होणार. आपल्याला पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांशी लढायचे आहे असं ही तो म्हणाला.  पहलगामसारख्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी. भारतीय भूमीवर दहशतवाद्यांना येऊ देऊ नये. असं ही तो म्हणाला.  पहलगाममध्ये झालेल्या भयावह घटनेची आठवण करताना तनुज म्हणाला की, दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांना त्यावेळी गोळी मारली, जेव्हा ते एका डोंगरावरून खाली उतरत होते. तो म्हणाला गोळी लागल्यानंतर ते त्वरित खाली पडले. माझी आई आणि मी त्यांच्या दिशेने धावलो. पाहिले की त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

जेव्हा माझ्या आईने विचारले की त्यांना पाणी हवे आहे का, तेव्हा ते म्हणाले, हो. मी त्यांना पाणी दिले. दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांना मारण्यापूर्वी त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचे होते का, असे विचारले असता तनुज म्हणाला, नाही, पण मी त्यांना इतरांना त्यांच्या धर्माबद्दल विचारताना पाहिले आहे. त्याला हे देखील आठवले की घटनेनंतर त्याने आपल्या आईची काळजी कशी घेतली. तनुजची आई प्रिया दर्शिनी म्हणाल्या की, त्या आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करतील. त्या म्हणाल्या की, जर त्याला सैन्यात भरती व्हायचे असेल, तर त्या त्याला त्या दृष्टीने तयार करतील.

Advertisement