जाहिरात
This Article is From Apr 15, 2024

शेतकऱ्यांसाठी Good News; यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा IMDचा अंदाज

देशभरातील नागरिक आणि खासकरुन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतील हवामान विभागाने (IMD)  वर्तवला आहे.

शेतकऱ्यांसाठी Good News; यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा IMDचा अंदाज
हे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतील हवामान विभागाने (IMD)  वर्तवला आहे.
मुंबई:


देशभरातील नागरिक आणि खासकरुन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतील हवामान विभागाने (IMD)  वर्तवला आहे. देशभरात 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील वर्षी हवामान विभागाने 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र देभभरात 94 टक्के पाऊस झाला होता. 

अल निनोची प्रभाव पडणार नसल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.  ला निनाचा प्रभाव मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात दिसू शकतो. ला निनासाठी पोषक वातावरण दुसऱ्या टप्प्यात निर्माण होऊ शकतं. ला निनामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगल्या मान्सूनचा अंदाज आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.  

स्कायमेटने देखील आपला पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यंदा देशभरात सामान्य पावसाचा अंदाज आहे. देशभरात 102 टक्के पावसाचा अंदाज खासगी संस्था स्कायमेटने वर्तवला आहे.

एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
 

हवामान विभागाचे मागील 5 वर्षांचे अंदाज

हवामान विभागाने मागील वर्षी म्हणजे 2023 साठी सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.  मात्र देशात 94 टक्के पाऊस पडला होता. तर 2022 साली हवामान विभागाने 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. तर त्यावर्षी 106 टक्के पाऊस झाला होता. 2021 साली हवामान विभागाने 98 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला असताना 99 टक्के पाऊस झाला होता. 2020 साली सरासरीपेक्षा जास्त 109 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज होता. तर 100 टक्के पाऊस पडला होता. 2019 साली देखील हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त 110 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र 100 टक्के पाऊस झाला होता. 

गेल्या वर्षी 48 मिमी कमी पाऊस

मागील वर्षी हवामान विभागाच्या माहितीनुसार, 820 मिमी पाऊस झाला होता. तर सरासरी पाऊस 868.6 मिमी पाऊस होतो. म्हणजेच मागील वर्षी जवळपास 48 मिमी पाऊस कमी झाला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com