आधी पार्टी केली, नंतर दारूची बाटली घरी नेली, पुढे मात्र भयंकर घडलं

दारू वरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची चक्क हत्या केली आहे. दक्षिण गोव्यातील कोर्टालिम इथे ही घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पणजी:

रुपेश सामंत

गोव्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गोव्यात दारू ही सर्रास मिळते. पण त्याच दारू वरून गोव्यात वाद होत असेल तर, तोही टोकाचा. तुम्हाला पटणार नाही. पण तशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दारू वरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची चक्क हत्या केली आहे. दक्षिण गोव्यातील कोर्टालिम इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या मित्राला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्यांने खून का केला याचे उत्तर ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दक्षिण गोव्यातील कोर्टालिम येथे मित्रा- मित्रांनी पार्टीचे आयोजन केले होते. सात दिवसांपूर्वी झालेल्या या पार्टीत लिओनेल लोबो आणि ॲलेक्स कौटिन्हो हे सहभागी झाले होते. पार्टी चांगलीच रंगली होती. पार्टी त्यानंतर संपली. पण पार्टीत आणलेली दारू काही संपली नाही. मग त्या दारूचे काय करायचे असा प्रश्न होता. अशा वेळी लिओनेल लोबो ने ती उललेली दारू घरी नेली. ही बाब काही अॅलेक्स याला पटली नाही. त्याला त्या गोष्टीचा रागा आला. हा राग त्याने मनात धरून ठेवला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

पुढे काही दिवसांनी लिओनेल लोबो ठरलेल्या ठिकाणी दारू पिण्यासाठी पुन्हा आला. हे ठिकाण कोर्टालिममध्ये आहे. तिथे बांधकाम सुरू होते. पण त्या ठिकाणी कोणी नव्हते. लिओनेल तिकडे आहे याची माहिती अॅलेक्सला मिळाली. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तो लिओनेल होता त्या ठिकाणी गेला. मात्र तिथे लिओनेल दारूच्या नशेत झोपलेला त्याला दिसला. हीच संधी साधत तिथे असलेले सिमेंटचे ब्लॉक त्याने हातात घेतले. त्यानंतर त्याच ब्लॉकने त्याने लिओनेलचे डोके ठेचले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज

पोलिसांना रात्री उशिरा या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिस घटना स्थळी पोहोचले. वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली होती. पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यावेळी त्यांना लिओनेल आणि अॅलेक्स पार्टी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अॅलेक्स याला ताब्यात घेतले.त्यानंतर चौकशी दरम्यान अॅलेक्सने गुन्ह्याची कबूली दिली. शिवाय आपल्याला त्याने उरलेली दारू घरी घेवून जाणे आवडले नाही. त्याचा राग आपल्याला आला. त्यामुळेच खून केला अशी धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणी आरोपीला भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103 अंतर्गत हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फॉरेन्सिक तपासणी दरम्यान, आरोपीच्या कपड्यांवर लिओनेलच्या रक्ताचे डाग आढळले आहेत. शिवाय त्याच्या नखांमध्येही रक्त आढळले आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक सुनीता सावंत यांनी दिला आहे. 

Advertisement