जाहिरात
Story ProgressBack

लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज

या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत आता वाढवण्यात आली आहे.

Read Time: 2 mins
लाडकी बहीण  योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज
मुंबई:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारने केली आहे. या योजने अंतर्गत पात्र प्रत्येक महिलेला दर महा 1500 रूपये मिळणार आहेत. या योजनेला आता मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. पुढील दोन महिने म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येवू शकता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या शिवाय काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. काही कागदपत्रांना पर्याय सरकारने देण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर  त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

त्याच बरोबर या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. शिवाय लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सख्खा भाऊ ज्यांना समजला नाही त्यांना 'लाडकी बहीण' काय समजणार? शिंदेंचे ठाकरेंवर बाण

काहींकडे अडीच लाखाच्या उत्पन्नाचा दाखला नसले. तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे. सदर महिलेने पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड हेच त्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून समजले जाईल. शिवाय योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिलिटर मिळणार 'इतका' भाव
लाडकी बहीण  योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज
Five people killed and one injured in a car accident near Indapur
Next Article
कारचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जण जागीच ठार 1 जण बचावला
;