राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या महिलांना लाभ मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.
(नक्की वाचा- कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ)
नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र?
आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांगा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे.
(नक्की वाचा- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी तलाठी कार्यालये फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद)
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली. त्यानुसार आता 65 वर्षे वय असलेल्या महिलांनाही त्याचा फायदा होणार आहे. अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे. याची दखल सरकारने घेतली असल्याचेही ते म्हणाले. शिवाय वेळ निघून जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्या पासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. बहीण लाडकी योजनाही महायुतीच्या भावांकडून बहीणींना दिलेला आहेर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world