आयकर देणाऱ्यांकडे आता दोन प्रकरणाच्या कर प्रणालींपैकी एकाला निवडण्याचा पर्याय आहे. सरकारने जेव्हापासून नव्या कर प्रणालीमध्ये कर सवलतीच्या मर्यादा 5 लाखांहून वाढवून 7 लाखांपर्यंत केल्या आहेत, त्यामुळे ही अधिक आकर्षक ठरली आहे. यासोबतच यात 50 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दोघांपैकी कोणती कर व्यवस्था फायदेशीर आहे?
मात्र नुकतेच निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोणती कर प्रणाली निवडावी याबाबत गोंधळ आहे. निवृत्तीनंतर पगाराच्या तुलनेत निवृत्तीवेतन कमी होणे आणि नव्या कर प्रणालीअंतर्गत कर सवलतीची मर्यादा वाढल्यामुळे हा गोंधळ वाढला आहे. येथे आपण हाच मुद्दा समजून घेणार आहोत.
मात्र सर्वात आधी ही बाब जाणून घेणं आवश्यक आहे की, आयकर विवरण भरताना कोणत्याही करदात्याला नवी कर प्रणाली डिफॉल्ट पर्याय म्हणून दिसेल. मात्र तुम्ही तुमच्यानुसार, यात बदल करू शकता. म्हणजे जर तुम्ही जुन्या कर प्रणालीचा स्वीकार करू इच्छिता तर तुम्हाला तो पर्याय निवडावा लागेल.
वयानुसार आयकर स्लॅब आयकराच्या नियमांतर्गत 60 वर्षांहून अधिक आणि 80 वर्षे वयापर्यंत ज्येष्ठ नागरिक मानलं जातं. तर 80 वर्षे वयापुढील नागरिकांना 'सुपर सीनियर सिटीजन'चा दर्जा दिला जातो. नव्या कर प्रणालीमध्ये आयकरचे स्लॅब सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी एकसारखे आहेत. मग ते 60 वर्षांहून कमी, जास्त किंवा 80 वर्षांपर्यंत किंवा त्याहून मोठे असोत. मात्र जुन्या कर प्रणालीत ज्येष्ठ आणि सुपर सीनियर सिटीजन्सच्या दरांमध्ये थोडा फरक आहे.
नव्या प्रणालीत आयकर स्लॅब
> 3 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर नाही
> 3 लाखांपेक्षा जास्त आणि 6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 5% कर
> 6 लाखांपेक्षा जास्त आणि 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 10% कर
> 9 लाखांपेक्षा जास्त आणि 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 15% कर
> 12 लाखांपेक्षा जास्त आणि 15 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 20% कर
> 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर 30% कर
हे ही वाचा-आता 65 वर्षांवरील नागरिकही खरेदी करु शकणार आरोग्य विमा
नव्या कर व्यवस्थेत 7 लाखांपर्यंत आयकर मोफत
नव्या कर रचनेत 3 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर कर द्यावे लागतात. मात्र ज्यांच वार्षिक उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे, त्यांना कलम 87A अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळेल. सवलतीमुळे त्यांचं कर दायित्व माफ करण्यात येते.
याशिवाय पगार सुरू असणारे आणि पेन्शन मिळणाऱ्यांना 50 हजारांचा स्टँडर्ड डिडक्शनही मिळेल. यासोबत 7.5 लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर द्यावा लागत नाही. तर जुन्या करव्यवस्थेत कर सवलतीचा लाभ फक्त 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच मिळतो.
जुनी कर प्रणाली : 60 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कर स्लॅब
> 3 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर नाही
> 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 5% ते रु. 5 लाखांपर्यंत
> 5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर: रुपये 10,000 + 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाच्या 20%
> 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर: 1.10 लाख रुपये + 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाच्या 30%