जाहिरात
Story ProgressBack

आता 65 वर्षांवरील नागरिकही खरेदी करु शकणार आरोग्य विमा

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) 1 एप्रिल 2024 पासून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची वयोमर्यादा शिथिल केली आहे.

Read Time: 2 min
आता 65 वर्षांवरील नागरिकही खरेदी करु शकणार आरोग्य विमा
नवी दिल्ली:

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यात वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी आरोग्य विमा काढणे हा जीवन सुरक्षित करण्याचा एक सोपा मार्ग आहे. मात्र आरोग्य विम्यामधील वयोमर्यादांच्या अटीमुळे वरिष्ठ नागरिकांना आरोग्य विमा घेताना अनेक अडचणी येत होत्या. 

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) 1 एप्रिल 2024 पासून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची वयोमर्यादा शिथिल केली आहे. याआधी एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षापर्यंत नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्याची परवानगी नव्हती. मात्र ही  अट आता काढून टाकण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत तर नाही, या चुका टाळा!)

त्यामुळे 1 एप्रिल 2024 पासून लागू झालेल्या बदलांनुसार कुणीही नवीन आरोग्य विमा खरेदी करण्यास पात्र आहे. IRDAI निवेदन जारी कर सर्व कंपन्यांना सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग विमा सुविधा पुरवण्याची सूचना केली आहे. 

देशातील सर्व नागरिकांना आरोग्य विमा कवच पुरवणे आणि विमा कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणणे हा IRDAI चा उद्देश आहे. त्यामुळे ६५ वर्षांपुढील नागरिक देखील आपला आरोग विमा काढण्यास सक्षम असतील. नव्या बदलांनुसार आता विमा कंपन्यांना कर्करोग, हृदयरोग आणि एड्स सारख्या गंभीर आजार असतील तरी त्या व्यक्तींना आरोग विमा घेता येणार आहे.

(नक्की वाचा - कमी झोपेमुळे 'Silent Epidemic' चा धोका, काय आहे हा आजार?)

आरोग्य विमा खरेदीचे फायदे?

  • आरोग्य विमा खरेदीमुळे एखाद्या मोठ्या आजारपणात आर्थिक संरक्षण मिळते. आजारपणात उपाचारांवर लक्ष द्यावे की पैशांची जमवाजमव करावी याची चिंता राहत नाही. 
  • दीर्घकालीन आजारांचं निदान झालं असल्यास आरोग्य विम्यामुळे रुग्णाला खर्चामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. 
  • आरोग्य विम्यामध्ये कॅशलेस सुविधा देखील मिळते. ज्यामुळे एक रुपयाही खर्च न करता रुग्णाला उपचार मिळू शकतात.
  • आरोग्य विमा प्रीमियमच्या आधारे आयकर कायदा कलम 80D अंतर्गत करलाभ देखील विमाधारकाला मिळू शकतो.
  • Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination