
79th Independence Day 2025 Delhi: देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्यावर बोलत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीत मोठे गिफ्ट देणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.
काय म्हणाले मोदी?
"यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठे गिफ्ट देणार आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म आणणार आहोत. . गेल्या आठ वर्षांत, जीएसटीमध्ये खूप मोठी सुधारणा करण्यात आली आहे. आठ वर्षांनंतर, काळाची गरज आहे की आपण त्याचा आढावा घेतला पाहिजे. आम्ही त्याचा आढावा घेतला आणि निर्णय घेतला की आपण पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. आपल्या एमएसएमईंना याचा फायदा होईल. अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होईल. आज, देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने सतत काम करत आहे. आपण हे खूप लवकर साध्य करू' असं PM मोदी म्हणालेत.
"त्याचबरोबर आज महागाई नियंत्रणात आहे, परकीय चलन साठा मजबूत आहे, जागतिक रेटिंग एजन्सी देखील सतत भारताचे कौतुक करत आहेत. अधिकाधिक लोक भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत आहेत. गरीब, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांना या वाढत्या अर्थव्यवस्थेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सतत या दिशेने काम करत आहोत. आज नवीन क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"गेल्या वर्षी आपल्या देशातील शेतकऱ्यांनी धान्य उत्पादनात मागील सर्व विक्रम मोडले. देशातील शेतकऱ्यांची ताकदही वाढत आहे. आज भारत दूध आणि डाळींच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे, आज आपण मत्स्य उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज भारत तांदूळ, गहू, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे," असं सांगत देश शेतीमध्ये मोठी क्रांती करत असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world