
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर भारताच्या शहरांना हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारतानं निष्फळ ठरवले. भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 6 हवाई तळाचं मोठं नुकसान झालं.
दोन्ही देशांमधील संघर्ष काय वळण घेणार? याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधी करण्यासाठी तयार झाले आहेत, असा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीला यश आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेच्या प्रयत्नान आणि रात्री झालेल्या दिर्घ चर्चेनंतर, मला ही घोषणा करताना आनंद होतोय की, भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झालेले आहेत. कॉमन सेन्स आणि बुद्धीचा वापर केल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन. या विषयाकडं लक्ष दिल्याबद्दल तुमचे आभार, असं ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world