रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai News : व्यापारी जहाजांचे अपहरण करून अरबी समुद्रात दहशत माजवणाऱ्या सोमालियन चाचे किंवा सोमालियन पायरेट्सना भारताने मोठा कायदेशीर दणका दिला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने 43 सोमालियन चाचे यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना दुहेरी जन्मठेप सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अरबी समुद्रात या चाच्यांना पकडण्यासाठीची कारवाई तब्बल 40 तास सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. दिघे यांच्यासमोर पार पडली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील रणजीत सांगळे यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केला.
पुणे विद्यापीठाकडून घेतली मदत...
सोमालियन चाचे यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर NDTV मराठीने सहाय्यक पोलीस आयुक्त माया मोरे यांच्याशी संवाद साधला. सोमालियन पायरेट्स यांना अटक करणे अवघड होतं. त्यात त्यांची भाषा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर संवाद साधून गुन्हा दाखल करणं हे सर्वात मोठं चॅलेंज होतं.
सोमालियन पायरेट्स यांची भाषा कळावी यासाठी पुणे युनिव्हर्सिटीकडून एक ट्रान्सलेटर घेण्यात आला. त्यांच्या माध्यमातून सोमालियन पायरेट्स आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर NIA सारखी चार्जशीट माया मोरे आणि त्यांच्या टीमने कोर्टासमोर सादर केली. देशाला एक मोठा मेसेज देण्याचा काम आज मुंबई विशेष सेशन कोर्टाने केलं आहे. जर अरबी समुद्रामध्ये सोमालियन पायरेट्स यांच्या माध्यमातून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांचवर देखील कडक कारवाई केली जाणार असल्याचं माया मोरे यांनी सांगितलं. माया मोरे आणि त्यांच्या टीमने अरबी समुद्रात घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अवघ्या ३ महिन्याचा आत चार्जशीट कोर्टासमोर सादर केली. आजच्या निकालानंतर देशाला एक मोठा संदेश दिला गेला आहे. जर अरबी समुद्रामध्ये सोमालियन चाचेंच्या माध्यमातून जहाज लुटण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्याच्यावरती मुंबई पोलीस आणि विशेषतः महाराष्ट्रात पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल, असंही माया मोरे यावेळी म्हणाल्या.
नक्की वाचा - 'तू मुसलमान आहेस?' अमेरिकेत धर्म विचारून भारतीय व्यक्तीला 15 वेळा चाकूने भोसकलं!
सोमालियन पायरेट्स कोण आहेत?
सोमालियन पायरेट्स म्हणजे समुद्री लुटणारे किंवा त्यांना सोमालियन चाचेही म्हटलं जातं. हे पायरेट्स प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेचा देश सोमालिया आणि त्याच्या आजूबाजूचा किनारी प्रदेश विशेषत: पुंटलँड भागात राहणारे आहेत. हे डाकू मुख्यत: एडनचे आखात, गार्डफुई चॅनल आणि हिंद महासागरच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावरुन जाणाऱ्या मालवाहन जहाज, कॉर्पो शिप यांचं अपहरण करीत कोटींची खंडणी वसूल करतात.