जाहिरात

भारताकडे किती परकीय चलनसाठा? जगातील टॉप 10 देशांच्या यादीत आपला क्रमांक कितवा? पाहा संपूर्ण यादी

यामुळे आयातीचे पेमेंट करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर डॉलरचा साठा कायम ठेवावा लागतो.

भारताकडे किती परकीय चलनसाठा? जगातील टॉप 10 देशांच्या यादीत आपला क्रमांक कितवा? पाहा संपूर्ण यादी
  • भारताचा सध्याचा परकीय चलनसाठा सुमारे 690 अब्ज डॉलर्स असून आर्थिक लक्ष्यापेक्षा 310 अब्ज डॉलर्स कमी आहे
  • चीनकडे जगात सर्वाधिक परकीय चलन साठा असून त्याचा आकार 3.751 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे
  • भारत परकीय चलन साठ्यामध्ये पाचव्या क्रमांकावर असून त्यानंतर जर्मनी सहाव्या स्थानी आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Foreign Exchange Reserves: सध्या देश मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विदेश मुद्रा जास्तीत जास्त साठवावी. परदेशात असलेल्या भारतीयांनी पर्यटनासाठी कमीत कमी पाच पर्यटकांना  भारतात आणावे. जेणे करून त्यांच्या माध्यमातून भारतच्या परकीय चलन साठ्यात वाढ होईल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर भारताकडे सध्या किती परकीय चलनसाठा आहे याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय जगात परकीय चलनसाठ्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो याची ही उत्सुकता अनेकांना लागली होती. याबाबचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. शिवाय जगात कोणत्या देशाकडे सर्वात जास्त परकीय चलनसाठी आहे हे ही पाहाणार आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

भारताची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी देशाकडे किमान 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 95,71,000 कोटी रुपये परकीय चलनसाठा असणे आवश्यक आहे. सध्या भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह 690 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 66,03,990 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ लक्ष्यापेक्षा 310 अब्ज डॉलरने कमी आहेत अशी माहिती समोर आली आहे. सध्या इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. प्रति डॉलर रुपया 95 च्या पार गेला आहे. या स्थितीत आरबीआय बाजारात नियंत्रित हस्तक्षेप करत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 

नक्की वाचा - Salary of MLA: आमदारांना पगार नक्की किती असतो? आता का होत आहे मानधन गोठवण्याची मागणी?

सध्याच्या स्थितीत सर्वाधिक परकीय चलन कोणत्या देशाकडे आहे असा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यात चीनकडे सध्या सर्वाधिक परकीय चलन आहे. चीनचा विचार करायचा झाल्यास 3.751 ट्रिलियन डॉलर येवढे परकीय चलन त्यांच्याकडे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जपानचा क्रमांक लागतो. जपानकडे  1.383 ट्रिलियन डॉलर येवढे परकीय चलन आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे. त्यांच्याकडे 1.1 ट्रिलियन डॉलर आहे. तर चौथ्या क्रमांकावर रशिया आहे. रशियाकडे 758.7 अब्ज डॉलर आहे. पाचव्या क्रमांकावर भारत आहे. भारताकडे 690 अब्ज डॉलर आहेत. सहाव्या क्रमांकावर जर्मनी आहे. त्यांच्याकडे 640 अब्ज डॉलर आहेत. म्हणजे टॉप टेन देशात भारताचा क्रमांक पाचवा आहे. 

नक्की वाचा - Pune News: कोरेगाव पार्कमध्ये पार्टी केली, घरी परताना धावत्या कारमध्येच वकील तरुणी सोबत 3 जणांनी...

जगातील सर्वाधिक परकीय चलनसाठा असलेल्या देशांमध्ये अमेरिका समाविष्ट नाही, कारण अमेरिका स्वतः डॉलर छापते आणि जागतिक व्यापार डॉलरमध्येच होतो. सुरक्षिततेसाठी अमेरिका चलनाचा साठा करण्याऐवजी जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा बाळगते. भारताला लागणारे 90 टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची व्यापारी तूट 333.2 अब्ज डॉलर होती. जानेवारी महिन्यात आयात 19.2 टक्क्यांनी वाढून 71.24 अब्ज डॉलरवर पोहोचली, तर निर्यात केवळ 0.6 टक्क्यांनी वाढून 36.56 अब्ज डॉलर झाली. यामुळे आयातीचे पेमेंट करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर डॉलरचा साठा कायम ठेवावा लागतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com