भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला तणाव निवळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतानं लष्करी कारवाई करत 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतानं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी आणि त्यांचे नातेवाईक ठार झाले. भारताच्या हल्ल्याला पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पण, भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. त्याचबरोबर पाकिस्तानमधील एअरबेस देखील नष्ट केले.
दोन्ही देशातील संघर्ष चिघळल्यानंतर अमेरिकेनं पुढ येत मध्यस्थी केली. त्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमं शस्त्रसंधी जाहीर केली. पाकिस्ताननं शस्त्रसंधीची विनंती केली आणि ती विनंती भारतानं मान्य केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.
( नक्की वाचा : India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video )
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं,' असं पवार यांनी सांगितलं. पवार यांनी सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.
काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी याबाबतच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, ' भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.
पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.
भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे.
शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं.'
जय हिंद!