सध्या देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जात आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपची तिरंगा रॅली घेण्यात आली आहे. भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरनं दाखवलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून सैन्याचं कौतुक, तर बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांना लष्करानं नेस्तनाबूत केलं, भाजपच्या तिरंगा रॅलीत फडणवीसांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडलं.
Live Update : उल्हासनगरात पत्नी, मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या
उल्हासनगरात एका व्यक्तीनं पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. पवन आहुजा असं या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पवन हा उल्हासनगरच्या सोनार गल्ली परिसरातील एका दुकानात कामाला होता. बुधवारी रात्री पवन याने पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची हत्या केली, त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रित करत आपण आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगितलं.
Live Update : गोकुळ दूध संघात राजकारण तापलं, राजीनाम्याच्या चर्चेवर अध्यक्षांचं स्पष्टीकरण
गोकुळ दूध संघात राजकीय वातावरण तापलं आहे. विद्यमान अध्यक्ष राजीनामा देणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सध्या गोकुळ मध्ये महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. तर विरोधी गटामध्ये महाडिक गट आहे. गोकुळ दूध संघाचे सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे राज्यातील सरकारच्या विरोधात बसणं हे दूध संघासाठी योग्य ठरणार नाही अशी भूमिका ठेवली आहे. डोंगळे यांनी सध्या राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
Live Update : अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली असून या अपघातात सुदैवाने लोको पायलटसह गार्ड हे सुरक्षित असून जीवित हानी टळली आहे. भुसावळ कडून कोळसा घेऊन नंदुरबार कडे जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून या अपघातात मालगाडीचे डबे रुळावरून घसरून पडल्यामुळे सुरत भुसावळ दरम्यान अपडाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त मालगाडी हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत
Live Update : काश्मीरमधील अवंतीपोराच्या नादेर त्राल चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची मोठी कारवाई
अवंतीपोराच्या नादेर त्राल चकमकीत तीन दहशतवादी ठार
दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू
आसिफ शेख, आमिर आणि यावर हे सर्व जैश ए मोहम्मदशी संबंधित असण्याची शक्यता आहे..
जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलांना मोठे यश.
लष्कराची शोध मोहीम सुरू
Live Update : मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, केळी बाग भुईसपाट
मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
वादळी वाऱ्यामुळे पापरी पारिसरातील केळी बाग भुईसपाट
पापरी गावातील दत्ता कदम या शेतकऱ्याची दीड एकर केळी बाग जमीनदोस्त..
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला बसला लाखो रुपयांचा आर्थिक फटका
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
Live Update : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॉल
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॉल
पुण्यातील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान मधल्या सफरचंदांवर बहिष्कार टाकल्याने आले धमकीचे कॉल
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात तुर्कस्तानचे ड्रोन अढळून आल्याने बॉयकॉट टर्किश प्रॉडक्टला सुरुवात पुण्यातील मार्केट यार्डमधून सुरू झाले
त्याच पार्श्वभूमीवर फळ व्यापाऱ्यांना आज सकाळी ९:१५ च्या सुमारास धमकीचे व्हॉट्सअप कॉल यायला सुरुवात झाली
थोड्याच वेळात पुणे पोलिस आयुक्तांकडे या बाबत देणार तक्रार अर्ज
Live Update : पुण्यात कोयता वॉर थांबेना, पुण्यातील दत्तवाडी परिसरात भर दुपारी कोयत्याने वार
पुण्यात कोयता वॉर थांबेना, पुण्यातील दत्तवाडी परिसरात भर दुपारी कोयत्याने वार
दत्तवाडीमध्ये पूर्ववैमस्यातून एकावर कोयत्याने वार
युवकाने वार करत हातात कोयता घेऊन परिसरात पसरवली दहशत
तर घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
दत्तवाडी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Live Update : दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्रालमध्ये भीषण चकमक
दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल भीषण चकमक झाली.
48 तासांतील दुसरी चकमक
2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता
Live Update : पाकिस्तानचं भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पत्र
सिंधू जल करार स्थगितीवर पुनर्विचार करा, स्थगितीमुळे पाकिस्तानची खरीपाची शेती संकटात, पाकिस्तानचं भारताच्या जलशक्ति मंत्रालयाला पत्र