सुनील कुमार, प्रतिनिधी
भारत पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून चिथावणीखोर कृत्य करीत नागरी वस्त्या, वैद्यकीय केंद्र, शाळा परिसर आणि सैन्यांची ठिकाणं टार्गेट केली जात आहेत. त्यावर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर, राजस्थान येथील सीमाभागातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्याम सर्व जवानांना तातडीने ड्यूटीवर बोलावण्यात आलं आहे. युद्धजन्यपरिस्थितीत लेकाला घरातून सोडणं किती कठीण असून शकतं हे या घटनेवरुन समोर येतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात लातूरच्या औसा तालुक्यातील जावळी गावचे कैलास सूर्यवंशी हे जवान आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याकरिता आणि लग्नाच्या वाढदिवसाकरिता 45 दिवसाच्या सुट्टीवर आले होते मात्र अचानक देश सेवेसाठी रुजू होण्याकरिता कॉल आल्याने ते आज आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लातूर वरून निघाले आहेत.
राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणच्या बॉर्डरवर या जवानाची ड्युटी आहे. यावेळी वडील, भाऊ आणि व्हिडिओ कॉल वरून पत्नीने भावनेच्या भरात जवानाला देश सेवेसाठी पाठवत होते. कैलास सूर्यवंशी यांचे वडील तर त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होते. यावेळी सूर्यवंशी यांच्याही डोळ्यात पाणी आल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा - Fack check : भारताची रणरागिणी शिवानी सिंहचा 'तो' व्हिडिओ फेक; सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा सुळसुळाट
सूर्यवंशी 2014 मध्ये भारतीय सेवेत दाखल झाले होते. राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणी सध्या त्याची नियुक्ती आहे. 45 दिवसाची सुट्टी मंजूर करून ते आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला आणि लग्नाच्या वाढदिवसासाठी गावी आले होते. 28 एप्रिलला कुटुंबासह त्यांनी मुलाचा वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा केला. त्या दिवशी अख्खं कुटुंब एकत्र आलं होतं. बायको, लहानगी लेक आणि मुलाच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र अचानक सुट्टी रद्द झाल्याने ते अकरा दिवसाच्या सुट्टीनंतरच पुन्हा परत देश संरक्षणासाठी गेले आहेत.
जळगाव, वाशिम या जिल्ह्यांमधूनच अशीच कर्तव्यनिष्ठ जवानांची उदाहरणं समोर आली आहे. लग्नासाठी म्हणून हे जवान सुट्टीवर घरी गेले होते. मात्र अचानक बोलणं आल्यानंतर लग्नाच्या अवघ्या दोन ते चार दिवस ते ड्यूटीवर परतले. कर्तव्यतत्पर, देशसंरक्षणासाठी स्वत:ची स्वप्न, आनंद दुय्यम मानणाऱ्या सर्व जवानांना कडक सॅल्यूट.