
भारताच्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानच्या नाकी नऊ आले आहेत. भारताकडून प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात वारंवार अयशस्वी ठरल्यामुळे पाकिस्तानकडून सोशल मीडियावरही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून विविध पातळीवर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान भारतीय एअरफोर्सच्या एका महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानच्या सोशल मीडियावरुन करण्यात येत आहे.
एअरफोर्स पायलट शिवानी सिंहका पकडल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या...
पाकिस्तानी हल्लाचा भारतीय सैन्याकडून सातत्याने चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. मैदानात भारताविरोधात जिंकण कठीण असल्याचं लक्षात येताच पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. भारतीय महिला पायलटला पकडण्यात आल्याची खोटी बातमी पाकिस्तानकडून पसरवली जात आहे. भारताची पहिली राफेल फायटर पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंहला पकडण्यात आल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे.
भारतीय महिला पायलटला पकडण्यात आल्याची खोटी बातमी पसरवण्याशिवाय पाकिस्तानकडून भारतीय ग्रीडवरही सायबर हल्ल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे. ज्यामध्ये ग्रीडवर झालेल्या हल्ल्यामुळे भारतात 70 टक्के वीज गुल झाली आहे, हा दावाही चुकीचा आहे. पीआयबीने या प्रकरच्या बातम्या अत्यंत चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world