आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आज (9 मे) पाकिस्तानसाठी विस्तारलेल्या निधी सुविधेच्या (Extended Fund Facility - EFF) 1 अब्ज डॉलर कर्ज कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ पाकिस्तानला 1 अब्ज डॉलरला (8500 कोटी) मंजुरी मिळाली आहे. पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला आयएमएफकडून आर्थिक कर्जासाठी मंजुरी मिळाली आहे. पाकिस्तानने यापूर्वीच 1.3 अब्ज डॉलर कर्जाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी भारताकडून या कर्जाचा विरोध करण्यात आला. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर इतकं मोठं कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
IMF कडून पाकिस्तानला वारंवार मोठ्या संख्येने आर्थिक मदत केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, एक अब्ज डॉलर एक्सटेंडेट फंड फॅसिलिटीअंतर्गत तत्काळ दिले जाणार आहे. पुढील 28 महिन्यात 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजे 11 हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून कर्ज मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Pune News: तरुणीला आला पाकिस्तानचा पुळका, सोशल मीडियावर केली अशी पोस्ट की करावी लागली जेल वारी
पाकिस्ताननं 1989 पासून पुढील 35 वर्षांमध्ये 28 वर्ष IMF कडून निधी मिळवलाय. 2019 नंतरच्या पाच वर्षांमध्ये 4 स्वतंत्र IMF कार्यक्रमांची मदत घेतली आहे. त्यामुळे निधी सुविधेच्या कार्यक्रम आढावा बैठकीत पाकिस्तानला कर्ज देण्यास भारताने विरोध केला. पाकिस्ताननं कर्जाच्या निधीचा वापर हा सीमापार दहशतवाद्यांना प्रायोजित करण्यासाठी केला आहे. पाकिस्ताननं IMF कडून सातत्यानं कर्ज घेतलंय, पण त्यांच्या अटीचं पालन करण्याचा त्यांचा इतिहास अतिशय खराब आहे, याकडं भारतानं लक्ष वेधलं.