2 months ago

पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (12 मे) देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावून सांगितले.

May 12, 2025 20:46 (IST)

गजर पडल्यास शक्तीचा वापर गरजेचा : पीएम मोदी

टेरर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र चालू शकत नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही जगाला मी सांगतो की, पाकिस्तानशी बोलणे होईल तर ते दहशतवादासंदर्भातच होईल. पीओकेसंदर्भातच होईल.  गजर पडल्यास शक्तीचा वापर गरजेचा आहे. गेल्या काही दिवसांत भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा सैन्य दल, सशस्त्र दलांना सॅल्यूट करतो.: PM मोदी

May 12, 2025 20:45 (IST)

या ऑपरेशनमध्ये मेड इन इंडिया शस्त्रांची उपयुक्तता सिद्ध झाली. आज जग बघतंय की 21 व्या शतकातील युद्धात मेड इन इंडिया शस्त्रांची वेळ आली आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सर्वांचे एकत्र राहणे गरजेचे आहे. एकता ही आपली मोठी शक्ती आहे. हे युग युद्धाचे नाही मात्र हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स हे उत्तम जगाची गॅरेंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या रितीने दहशतवादाला पोसत आहे, ते पाहता दहशतवादच पाकिस्तानला गिळून टाकेल. पाकिस्तानला वाचायचे असेल तर दहशतवादी ढाचा पाडावा लागेल:PM मोदी

May 12, 2025 20:44 (IST)

भारताच्या नागरिकांना संकटापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावले उचलत राहू. युद्धाच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली आहे. ऑपरेशन सिंदूरने यात नवा पैलू जोडला आहे. वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेच शिवाय नव्या युगातील युद्ध प्रकारातील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले:PM मोदी

May 12, 2025 20:43 (IST)

पाकिस्तानचा घाणेरडा चेहरा जगाला दिसला:PM मोदी

दहशतवादाला पोसणारे सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगवेगळे म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा घाणेरडा चेहरा जगाला दिसला. ठार मारलेल्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याचे मोठे अधिकारी आले होते. सरकारपुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. :PM मोदी

Advertisement
May 12, 2025 20:42 (IST)

...तर जशास तसे उत्तर दिले जाईल:PM मोदी

भारताचे सैन्य सतर्क आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदूर हे भारताचे दहशतवादाविरोधातील धोरण आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. जिथे दहशतवादाची मूळे आहेत तिथे जाऊन कठोर कारवाई करू. आण्विक अस्त्राच्या आधारे ब्लॅकमेल भारत सहन करून घेणार नाही. आण्विक अस्त्राच्या आडून दहशतवादी अड्ड्यांवर भारत निर्णायक कारवाई करेल:PM मोदी

May 12, 2025 20:40 (IST)

PM Modi speech Live Updates: दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते:PM मोदी

पाकिस्तानी हवाई दलाच्या एअरबेसला जबरदस्त नुकसान पोहोचवले. या एअरबेसचा पाकिस्तानला गर्व होता. पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतके उद्ध्वस्त केले, त्याचा अंदाजही पाकिस्तानला नव्हता. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान बदल्याचा रस्ता शोधायला लागला. विविध देशांकडे याचना करायला लागला. 10 मे च्या दुपारी मजबुरीने भारताच्या डीजीएमओंना फोन केला, मात्र तोपर्यंत दहशतवाद्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले होते, दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते. यामुळे पाकिस्तानकडून याचना केली गेली , दहशतवादी कारवाई यापुढे, सैनिकी कारवाई केली जाणार नाही तेव्हा भारताने त्यावर विचार केला आणि मी पुन्हा सांगतो की आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैनिकी ठिकाणांवर उत्तरादाखल केलेल्या कारवाईला स्थगित केले आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून:PM मोदी

Advertisement
May 12, 2025 20:39 (IST)

जगाने पाहिले की  पाकिस्तानी ड्रोन, मिसाइल कसे उद्ध्वस्त झाले. भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने त्यांना आकाशातच उडवले. पाकिस्तानला वाटत होतं की सीमेवर हल्ला होईल, मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावरच आघात केला:PM मोदी

May 12, 2025 20:34 (IST)

PM Modi speech Live Updates: भारताच्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले:PM मोदी

भारताच्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. गेल्या अडीच ते तीन दशकांपासून ते पाकिस्तानात मोकाट फिरत होते. जे भारताविरुद्ध कट रचत होते, त्यांना भारताने एका झटक्यात संपवले:PM मोदी

Advertisement
May 12, 2025 20:32 (IST)

"दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अचूक प्रहार केला"

6 मे रोजी उशीरा रात्री आणि 7 मे रोजी पहाटे संपूर्ण जगाने संपूर्ण जगाने हे वचन परिणामांमध्ये बदलताना पाहिलंय. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम ही भावना असते, देश सर्वोच्च असतो तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात: PM मोदी

May 12, 2025 20:27 (IST)

सर्वप्रथम मी भारताच्या पराक्रमी सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने सलाम करतो. आपल्या शूरवीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रचंड शौर्य दाखवले. मी त्यांचे धाडस आणि पराक्रम देशाच्या प्रत्येक आईला, बहिणीला, मुलीला आज समर्पित करतो: PM मोदी

May 12, 2025 20:22 (IST)

ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाहीय. हे देशाच्या कोटी कोटी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाचे शाश्वत वचन आहे. : PM मोदी

May 12, 2025 20:19 (IST)

बहिणी-मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसरण्याचे परिणाम

आम्ही दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्यासाठी भारतीय सैन्यांना पूर्ण मोकळीक दिली आणि आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांच्या प्रत्येक संघटनांना समजलंय की आमच्या बहिणी-मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे परिणाम काय असू शकतात: PM मोदी

May 12, 2025 20:16 (IST)

दहशतावादाविरोधात कठोर कारवाईची मागणी

संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज,  प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्षाने दहशतावादाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली: PM मोदी

May 12, 2025 20:14 (IST)

22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूरता दाखवली, त्यामुळे देश आणि जग हादरले. सुट्टी साजरी करणाऱ्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या मुलांसमोर निर्दयीपणे मारले, हे दहशतवादाचा अतिशय भयानक चेहरा होता, क्रूरता होती. हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते.:PM मोदी

May 12, 2025 20:09 (IST)

गेल्या काही दिवसांत जगाने भारताचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिले. त्यांनी देशाच्या तीनही सैन्यांना सलाम केला.: PM मोदी

May 12, 2025 20:07 (IST)

भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात मोकळीक दिली: PM मोदी

May 12, 2025 20:03 (IST)

मी सैन्याला सलाम करतो : PM मोदी

May 12, 2025 20:02 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन 

May 12, 2025 18:06 (IST)

Live Update: भाजपची उद्यापासून देशभरात तिरंगा यात्रा

भाजपची उद्यापासून देशभरात तिरंगा यात्रा

१३ मे ते २३ मे दरम्यान देशव्यापी १० दिवसांची तिरंगा यात्रा 

ऑपरेशन सिंदूरच यश नागरिकापर्यंत पोहोचण्या साठी काढली जातेय यात्रा

यात्रेत तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांना सहभागी होण्याच्या सूचना

May 12, 2025 17:53 (IST)

Nagpur Crime: नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

खदानीतील पाण्यात बुडून या पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती...

पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले...

एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे नेमके काय प्रकार घडला याची चौकशी कोणी पोलीस करत आहे.

May 12, 2025 17:17 (IST)

Nashik Rain News: नाशिकच्या मनमाड व परिसरात विजांच्या गडगडाट,जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नाशिकच्या मनमाड व परिसरात विजांच्या गडगडाट,जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

सकाळ पासून ऊन-सावलीचा खेळ होता सुरू

मात्र उकाड्याने नागरिक होते परेशान

दुपारच्या सुमारास अचानक जोरदार वारा, विजांचा गडगडाट आणि पावसाची हजेरी

पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा..

May 12, 2025 16:14 (IST)

LIVE Updates: PM मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार

ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधतील. यावेळी ते ऑपरेशन सिंदूर तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावाबाबत महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. 

May 12, 2025 15:07 (IST)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापर्यंत पापाचा घडा भरला होता- लेफ्टनंट जनरल राजीव घई

लेफ्टनंट जनरल राजीव घई 

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यापर्यंत पापाचा घडा भरला होता. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि कारवाई करण्यात आली.पाकिस्तानचे ड्रोन आणि शस्त्रांचे हल्ले हाणून पाडले. अनेक ड्रोन्स देखील पाडण्यात आले. मला बीएसएफचेही कौतुक करायचे आहे. त्यांनी आम्हाला धैर्याने पाठिंबा दिला. यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त करता आल्या."

May 12, 2025 14:43 (IST)

Live Update : आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवादींविरोधात, पाकिस्तान लष्कराविरोधात नाही - एअर मार्शल ए.के. भारती

आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवादींविरोधात, पाकिस्तान लष्कराविरोधात नाही  - एअर मार्शल ए.के. भारती

आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. यासाठी आम्ही केवळ ७ मे दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. मात्र पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना मदत केली. पण पाक लष्कराने ती लढाई स्वत:ची लढाई समजले. त्यामुळे या लढाईत त्यांचं जे काही नुकसान झालंय त्यासाठी ते स्वत: जबाबदार आहेत. भारतीय हवाई दल शत्रूंविरोधात भिंतीसारखी उभी होती. ही भेदणं शत्रूला कठीण होतं.

May 12, 2025 11:52 (IST)

Live Update : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Live Update : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

May 12, 2025 10:58 (IST)

Live Update : तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; DGMO च्या बैठकीपूर्वी मोठी चर्चा

तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; DGMO च्या बैठकीपूर्वी मोठी चर्चा 

May 12, 2025 10:26 (IST)

Live Update : भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर बारनेर, जैसलमेरमधील जनजीवन पूर्वपदावर

May 12, 2025 10:24 (IST)

Live Update : मुंबईतील विमानतळावरून जवळपास 25 ठिकाणी विमान वाहतूक अद्याप बंद

मुंबईतील विमानतळावरून जवळपास 25 ठिकाणी विमान वाहतूक अद्याप बंद आहे 

उत्तर भारतातील श्रीनगर जम्मू चंदीगड यासह काही विमान तुर्तास बंद आहे

May 12, 2025 09:35 (IST)

Live Update : भारत पाकिस्तान तणावादरम्यान शेअर बाजारात जोरदार तेजी

भारत पाकिस्तान आणि रशिया युक्रेन या दोन्ही युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता कमी झाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी परत येण्याची शक्यता आहे.  GIFT Nifty 484 अंशांनी वधारला. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक किमान 2 टक्के वधारुन उघडतील अशी शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी बाजारात दमदार विक्री झाली होती. आज मात्र गमावलेले सगळं भरुन निघण्याची चिन्हं आहेत.

बाजारातील उसळीची कारणे - 

१ भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव ओसरला 

२ रशिया यूक्रेन यांच्यात १५ मे पासून थेट वाटाघाटी

३ अमेरिका चीन व्यापार युद्धात तोडगा निघण्याची शक्यता, चालू आठवड्यातच दोन्ही देशांच्या वाटाघाटी होणार 

४ मान्सून वेळेआधीच केरळमध्ये येण्याची शक्यता 

५ चौथ्या तिमाहीचे निकाल बहुतेक कंपन्याचे निकाल समाधानकारक

May 12, 2025 08:08 (IST)

Live Update : पन्हाळगडावर एका तासात 22 मि.मी इतका पाऊस

पन्हाळगडावर एक तासात 22 मी. मी इतका पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. पावसाची सर्वजण प्रतीक्षा करत होते. अचानक सायंकाळी पाच वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या दोन शिळा कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. उष्णतेने हैराण असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला.

May 12, 2025 07:57 (IST)

Live Update : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन

सर्वपक्षीय मेळाव्यात निर्णय 

आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड यांच्यासह इतर नेते, शेतकरी आणि पुरबाधित ग्रामस्थ उपस्थित

अंकली पूल येथे शेतकरी आणि पुरबाधित ग्रामस्थ एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त करण्यावर एकमत 

May 12, 2025 07:17 (IST)

Live Update : मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार आज एका व्यासपीठावर

राज्यातील सहकार चळवळीवरुन नेहमीच एक दुसऱ्याकडे बोटे दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोमवारी एका व्यासपीठावर येणार आहेत.

राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' या विषयावरील परिसंवादात दोन्ही नेते आपली सहकाराबाबतची भूमिका मांडणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

May 12, 2025 07:16 (IST)

Live Update : राहुल गांधींसह मलिकार्जुन खर्गेंचं मोदींना पत्र...

ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीच्या घोषणांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा, राहुल गांधींसह मलिकार्जुन खर्गेंचं मोदींना पत्र...

May 12, 2025 06:33 (IST)

Live Update : तिबेटमध्ये भूकंपाचे हादरे...

तिबेटमध्ये भूकंपाचे हादरे...

May 12, 2025 06:31 (IST)

Live Update : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 528 हेक्टर शेत पिकांचं नुकसान

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे 528 हेक्टर शेत पिकांचं नुकसान झालं होतं. 720 शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. या प्रस्तावावर कारवाई झाल्यानंतर मदतनिधी मिळणार आहे. मात्र एकीकडे मदतीची मागणी होत असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे परत नुकसान होत आहे. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.