India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट

आज परराष्ट्र मंत्रालय आणि सशस्त्र दलाची संयुक्त बैठक होणार आहे. त्यापूर्वी भारतीय हवाई दलाने एक सूचक ट्वीट केलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

भारत पाकिस्तान तणावादरम्यान 10 मेच्या सायंकाळी केलेल्या शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आलं. रात्री उशीरा परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या भ्याड कृत्यावर संताप व्यक्त केला. दरम्यान आज परराष्ट्र मंत्रालय आणि सशस्त्र दलाची संयुक्त बैठक होणार आहे. त्यापूर्वी भारतीय हवाई दलाने एक सूचक ट्वीट केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय हवाई दलाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामं अत्यंत अचूकतेने आणि यशस्वीपणे पार पडली आहे. या ऑपरेशनमध्ये राष्ट्रीय उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी सुसंगत, सावधगिरीने आणि जाणीवपूर्वक पाऊलं उचलण्यात आली. 

ऑपरेशन अजूनही सुरू आहे, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल, असंही हवाई दलाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि त्याचा प्रसार करू नये. 

Advertisement

नक्की वाचा - India Pakistan Tension : कुटुंबातील प्रत्येक पुरुष ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर; प्रज्ज्वलदेखील लग्नानंतर भुजला रवाना

तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटीला 

दिल्लीमध्ये सशस्त्र दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या कारवाई संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली ते अद्याप कळू शकलेलं नाही. आज परराष्ट्र मंत्रालय आणि सशस्त्र दलाची संयुक्त बैठक घेणार आहे, यामध्ये बैठक काय निर्णय घेतला याची माहिती मिळू शकेल.