जाहिरात

India Pakistan Tension : कुटुंबातील प्रत्येक पुरुष ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर; प्रज्ज्वलदेखील लग्नानंतर भुजला रवाना

रुपनर कुटुंबाची तिसरी पिढी सैन्यात आहे. त्याचे आजोबाही सैन्यात देशाचं रक्षण करीत होते. आता प्रज्ज्वलदेखील भुजला दाखल झाला आहे. 

India Pakistan Tension : कुटुंबातील प्रत्येक पुरुष ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर; प्रज्ज्वलदेखील लग्नानंतर भुजला रवाना

शरद सातपुते, प्रतिनिधी

नुकतेच लग्न झालेले आणि हळदीच्या अंगाने असलेले खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रुपनर देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले आहेत. प्रज्वल यांचे वडील, काका आणि सख्खा भाऊ सुद्धा सध्या देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहेत. प्रज्वल यांचे आजोबा सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते. रुपनर कुटुंबीयांनी देश सेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनर यांचे औक्षण केलं. तर ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिंमत रूपनूर 2020 ला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते. प्रज्वल रुपणूर यांचा 14 एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला. दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भुज येथे हजर राहण्यासाठी रवाना झाले. घरातून निघताना रुपनर कुटुंबीयांनी जवान प्रज्वल रुपनर यांचे औक्षण केलं. तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगुले, हर्षद पाटील, वैभव माने, अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

India Pakistan Tension : 'भारतीय लष्कराचे धन्यवाद', कोल्हापुरातील दाम्पत्याची बचतीच्या पैशातून सैन्याला 5 लाखांची मदत

नक्की वाचा - India Pakistan Tension : 'भारतीय लष्कराचे धन्यवाद', कोल्हापुरातील दाम्पत्याची बचतीच्या पैशातून सैन्याला 5 लाखांची मदत  
रुपनर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे. आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनुर सैन्यात होते. त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिंमत रूपनूर पूंछमध्ये तैनात आहेत. तर चुलते गोरख रूपनूर सध्या काश्मीर सीमेवर आहेत. तर प्रज्वल यांचे धाकटे बंधू प्रमिल रुपणूर बांगलादेश सीमेवर आहेत. घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. घरात सध्या फक्त महिला असून आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी करून यावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com