India Pakistan News : मुंबई-दिल्ली हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवली

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्टा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य पातळीवरही सरकारने सर्व अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. याशिवाय जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे , रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच पॅडवर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर प्रत्येक राज्यातील पोलिसही सतर्क आहेत. मुंबई पोलिसांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात आपत्कालिन परिस्थितीतच सुट्टी मंजूर करता येईल असं सांगितलं जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला रजा दिली जाणार नाही, यामध्ये दिल्ली सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नक्की वाचा - India vs Pakistan : भारताने पाकिस्तानची 4 फायटर जेट्स पाडली, अनेक मिसाईल-ड्रोन्सही उद्ध्वस्त

कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ पहाटेपासून पुन्हा गोळीबार सुरू आहे. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून ऑपरेशन सुरू असून पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताची जोरदार कारवाई सुरू आहे. नियंत्रण रेषेवरील जवळजवळ सर्व ठिकाणी गोळीबार होत आहे. पाकिस्तानच्या कारवाईला भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिलं जात आहे. श्रीनगरमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडीत आहे.

Advertisement

रात्रभर काय-काय घडलं?

  1. LOC जवळ स्फोट, जम्मूत संपूर्ण ब्लॅकआऊट
  2. भारत सरकारने दिलेल्या आदेशानंतर X ने 8 हजार खाती बंद करण्याचा निर्णय घेतला. 
  3. पाकिस्तानने PSL चे उरलेले सगळे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला. 
  4. शुक्रवारी पहाटे जम्मू कश्मीरमध्ये पूंछ, राजौरीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले
  5. भारत-पाकिस्तानमधील तणावात अमेरिका पडणार नाही, चर्चेने प्रश्न सोडवला जावा जेडी वान्स यांचे विधान
  6. भारत आणि पाकिस्तानातील तणाव आण्विक युद्धाचे रुप घेऊ नये अशी आशा करतो, जेडी वान्स यांचे विधान
  7. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव तत्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले
  8. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला.
  9. भारताने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्या.
  10. त्यानुसार भारतानेही पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला
  11. भारताने आधीच बजावले होते, कुरापत काढल्यास सोडणार नाही
  12. पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, मोहालीसह चंदीगडमध्ये गुरुवारी ब्लॅकआऊट केला 
  13. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावली, शुक्रवारी म्हणजे आज होणार बैठक
  14. पंजाबमधील शाळा, कॉलेजना पुढील तीन दिवस सुट्टी, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या.
  15. सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न BSF ने हाणून पाडला.
  16. भारताच्या हवाई हल्ला प्रतिरोधक प्रणालीने सगळे हल्ले फोल ठरवले
  17. जम्मूतील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अरनिलातील गावांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला
  18. अखनूर, सांबा, बारामुल्ला और कुपवाडा इथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर सायरन वाजू लागले
  19. भारताने पाकिस्तानची 4 विमाने आणि 8 ड्रोन पाडले
  20. मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न 
  21. जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न
  22. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला.