Alcohol Prices to Drop: जागतिक व्यापार क्षेत्रात भारताने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारतीय मद्यप्रेमींसाठी आणि बार व्यवसायासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या बाजारपेठांशी भारताने 10 दिवसांच्या अंतरात ऐतिहासिक व्यापार करार केले आहेत. यामुळे परदेशी ब्रँडेड मद्य आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
भारतीय मद्य बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणारे दोन मोठे करार केंद्र सरकारने मार्गी लावले आहेत. 27 जानेवारी रोजी युरोपियन युनियनसोबत आणि आज 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेसोबत झालेल्या 'ट्रेड फ्रेमवर्क'मुळे परदेशी मद्यावर असलेली 14०% आयात शुल्काची (Import Duty) भिंत आता कोसळणार आहे. या निर्णयामुळे दिल्ली, नोएड आणि गुरुग्रामसह देशभरातील मद्य बाजारात मोठी स्वस्ताई पाहायला मिळू शकते.
(नक्की वाचा- Mumbai Crime News: बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं सीए-इंजिनिअर, तरीही अट्टल चोर; एका गोष्टीमुळे अडकला)
5000 रुपयांची बाटली 3000 रुपयांमध्ये
आत्तापर्यंत दुबई किंवा सिंगापूरमध्ये स्वस्त मिळणारी स्कॉच किंवा बोर्बोन (Bourbon) भारतात प्रचंड महाग होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर असलेले 166% आयात शुल्क. मात्र, नवीन करारानुसार हे शुल्क 30% ते 40% पर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे जी स्कॉचची बाटली पूर्वी 4500 ते 6000 रुपयांना मिळत होती, तिची किंमत आता 2500 ते 3000 रुपयांपर्यंत* खाली येईल.
स्कॉच विरुद्ध बोर्बोन
आयात शुल्क कमी झाल्यामुळे भारतात जागतिक 'ड्रिंकिंग कल्चर'ला चालना मिळणार आहे. स्कॉच आणि आयरिश व्हिस्की उत्पादक आपल्या परंपरेच्या जोरावर 'स्टेटस सिंबल' जपणाऱ्या श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करतील. अमेरिकन 'बोर्बोन' व्हिस्की आता भारतीय बारमध्ये अधिक प्रमाणात दिसू लागेल, ज्यामुळे स्कॉच आणि बोर्बोनमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळेल.
(नक्की वाचा- Mumbai News: शिमल्याला फिरायला जाणं जीवावर बेतू शकतं! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं? वाचा)
स्वदेशी ब्रँड्ससमोर मोठे आव्हान
हा निर्णय ग्राहकांसाठी चांगला असला तरी भारतीय मद्य निर्मिती क्षेत्रासाठी तो एक इशारा आहे. 'इन्द्री' (Indri) आणि 'अमृत' (Amrut) सारखे लोकप्रिय भारतीय क्राफ्ट ब्रँड्स आणि प्रीमियम 'जिन' (Gin) यांना आता थेट जागतिक ब्रँड्सशी स्पर्धा करावी लागेल. जेव्हा विदेशी 'जॅक डॅनियल्स'ची किंमत भारतीय प्रीमियम ब्रँडच्या बरोबरीला येईल, तेव्हा ग्राहकांची पसंती कोणाला असेल, हा कळीचा मुद्दा ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world