India-UK Free Trade Agreement : भारत आणि युकेदरम्यान ऐतिहासिक कराराची सध्या जगभरात चर्चा आहे. ही ऐतिहासिक ट्रेड डिल १५ जुलै २०२६ पासून अधिकृतपणे लागू होणार आहे. यामुळे भारत-ब्रिटेनमधील व्यापाराचा मार्ग अत्यंत सोपा आणि स्वस्त होणार आहे. सर्वसामान्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे १५ जुलैपासून अनेक ब्रिटीश प्रोडक्ट उदा. स्कॉच, व्हिस्की, चॉकलेट, जिन आणि कॉस्मेटिक्स भारतात स्वस्त होणार आहे. इतकच नाही तर या करारानंतर भारतीय व्यवसाय आणि एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना युकेच्या बाजारात मोठी संधी मिळेल.
UK FTA करार काय आहे?
भारत आणि युनायटेड किंगडमदरम्यान कॉम्प्रिहेन्सिक इकॉनॉमिक अँड ट्रेड एग्रिमेंट म्हणजे CETA वर गेल्या वर्षी २४ जुलै २०२५ रोजी स्वाक्षरी झाली होती. सुमारे १४ फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा करार झाला. आता १५ जुलै २०२६ पासून लागू होत आहे. या करारात केवळ सामानावरील टॅक्स कमी करण्याबद्दल चर्चा नाही तर डिजिटल व्यापार, फायनॅन्स, टेलिकॉम, नवी टेक्नॉलॉजी, लहान व्यवसाय सारखे अनेक दुसऱ्या सेक्टरचादेखील समावेश करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना काय फायदा होईल?
या करारानंतर ब्रिटनमधून येणारे अनेक प्रोडक्ट आधीपेक्षा स्वस्त होतील. यामध्ये स्कॉच, व्हिस्की, जिन, चॉकलेट, बिस्कीट, कॉस्मेटिक्स आणि काही ब्रिटीश कार यांचाही समावेश आहे. सर्व प्रोडक्टची किंमत एकत्र कमी होणार नाही. अनेक वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होतील. यासाठी येणाऱ्या वर्षात याच्या किमतीत आणखी कमी पाहता येईल.
स्कॉच आणि कार किती स्वस्त होणार?
आता स्कॉच, व्हिस्कीवर १५० टक्क्यांपर्यंत टॅक्स लागतो. मात्र करारानंतर हा टॅक्स ७५ टक्क्यांवर आणण्यात येईल. येत्या १० वर्षात हा टॅक्स ४० टक्क्यांपर्यंत घसरेल. यानुसार, ब्रिटीश कारवरही आतापर्यंत ११० टक्के टॅक्स लागला जात होता. विहित मर्यादेत येणाऱ्या गाड्यांवरील हा कर पुढील १० वर्षांत १० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. हाच नियम इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांनाही लागू होईल, जेणेकरून भारताच्या वाहन क्षेत्रावर अचानक परिणाम होणार नाही.
नक्की वाचा - पावसाची ओढ...सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढणार; धक्कादायक आकडेवारी समोर
भारतीय व्यावसायिकांना काय फायदा होईल?
या कराराचा सर्वाधिक फायदा भारताच्या एक्सपोर्ट सेक्टरला मिळेल. भारत आता सुमारे ९९ टक्के माल कोणत्याही आयात कराशिवाय यूकेमध्ये पाठवू शकेल. परिणामी भारतीय कंपन्यांसाठी तेथे व्यवसाय करणं सोपं आणि स्वस्त होईल. टेक्सटाइल, रेडिमेड कपडे, सीफूड, लेदर, फूटवेयर, स्पोर्ट्स गुड्स, खेळणे, जेम्स अँड ज्वेलरी, इंजिनियरिंग गुड्स, ऑटो पार्ट्स आणि ऑर्गेनिक केमिकल्ससारख्या सेक्टरला आता जास्त फायदा होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या वस्तू कराराच्या बाहेर?
सरकारने या करारात डेयरी, सफरचंद, साखर, चीज, तांदूळ, पोर्क, चिकन आणि अंडीसारख्या अनेक एग्री प्रोडक्ट्स सामील केलेले नाही. देशातील शेतकरी आणि डेयरी सेक्टरला स्वस्त डेयरी सेक्टरचा फटका बसू नये यासाठी अनेक पदार्थ या करारातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world