लडाखमध्ये नदी ओलांडताना लष्कराच्या टँकचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे या अपघाताची माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, टँक टी-72चा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त टँक प्रशिक्षण मोहीमेवर होता. यादरम्यान नदी ओलांडताना अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. लेहपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिराजवळ रात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणादरम्यान हा अपघात घडला.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?)
नदीची पाणी पातळी अचानक वाढली
शुक्रवारी (28 जून) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दौलत बेग ओडे परिसरात टँक युद्धाचा सराव सुरू होता. यादरम्यान नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
युद्धाभ्यासात टँक नदी ओलांडत असताना ढगफुटीमुळे नदीला पूर आला. यामुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "एक टँक अचानक पुरामध्ये अडकले, या दुर्घटनेमध्ये पाच जवान शहीद झाले." या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये एका ज्युनियर कमिशन्ड अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
(नक्की वाचा: मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती)