जाहिरात
Story ProgressBack

भारताचं हृदय पाकिस्तानात! 

एका भारतीय नागरिकाच्या हृदयामुळे आयशाला नवं आयुष्य मिळालं आहे. 

Read Time: 2 min
भारताचं हृदय पाकिस्तानात! 
चेन्नई:

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका भारतीय तरुणाचं हृदय पाकिस्तानी तरुणीला देण्यात आलं आहे. कराची येथे राहणारी 19 वर्षीय आयशा रशन हिला हृदयासंबंधित समस्या जाणवत होती. काही दिवसांपूर्वी या त्रासामुळे तिला एमजीएम हेल्थकेअरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे एका भारतीय तरुणाचं हृदय तिच्या आयुष्यात नवजीवन घेऊन आलं. तिच्यावर य़शस्वीपणे हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आणि एका भारतीय नागरिकाच्या हृदयामुळे आयशाला नवं आयुष्य मिळालं आहे. 

विशेष म्हणजे एका ट्रस्टच्या मदतीने हे हृदयप्रत्यारोपण मोफत झालं आहे. प्रकृती सुधारल्यानंतर आयशा पुन्हा कराचीला परतणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हृदयप्रत्यारोपणानंतर प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं आयशाने सांगितलं. आयशाला फॅशन डिझायनर व्हायचंय. भारतीय तरुणाकडून मिळालेल्या हृदयामुळे ती आपली स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. मुलाची जीव वाचवल्यामुळे आयशाच्या आईनेही रुग्णालय आणि मेडिकल ट्रस्टचे धन्यवाद मानले. ट्रस्ट आणि डॉक्टरांच्या सहकार्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य झाली नसती. इतका खर्च करणं त्यांना जमलं नसतं, असं आयशाच्या आईने सांगितलं. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्ट फेल झाल्यानंतर आयशाला ECMO मध्ये ठेवण्यात आलं होतं. गंभीर आजार किंवा गंभीर जखमी झालेल्यांसाठी ही यंत्रणा लाइफ सपोर्टचं काम करते. आयशाच्या हार्ट वॉल्वमध्ये लिकेज झालं होतं. तिला वाचवण्यासाठी प्रत्यारोप आवश्यक होतं. 

हृदय प्रत्यारोपणासाठी 35 लाखांहून अधिक खर्च...
हृदय प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण 35 लाखांहून अधिक खर्च येतो. आयशा रशन प्रकरणात शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च डॉक्टर आणि ट्रस्टकडून देण्यात आला आहे.  

दिल्लीतून आणलं हृदय...
इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड लंग्ज ट्रान्सप्लांटचे संचालक डॉ. के.आर. बालकृष्णन यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, आयशा नशीबवान होती की अल्पावधीतच हृदयाची व्यवस्था करण्यात आली. तिच्यासाठी हृदय दिल्लीहून चेन्नईला नेण्यात आले. यानंतर तातडीने रशनचं हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं. त्वरीत केलं गेलं कारण त्यावर कोणताही दावा नव्हता, अशी माहिती  डॉ. के.आर. बालकृष्णन यांनी दिली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination