Richest CM Of India: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानतरं नितीश कुमार आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या निमित्ताने देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबतची ताजी माहिती जाणून घेणे रोचक ठरेल. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या स्व-घोषित संपत्तीवर आधारित अहवाल सादर करते. 2025 च्या अहवालानुसार, भारतातील मुख्यमंत्र्यांची सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे 13.34 लाख आहे, तर सर्व मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती तब्बल 1,632 कोटी रुपये आहे.
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?
या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू अव्वल आहेत. त्यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपयांहून अधिक आहे. अनेक वर्षांपासून ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांची संपत्ती 332 कोटी रुपये आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया आहेत, ज्यांची संपत्ती 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
(नक्की वाचा- Aadhaar Card: आधारकार्डमध्ये होणार महत्त्वाचे बदल! कसं असेल नवीन कार्ड?)
देशातील टॉप 10 श्रीमंत मुख्यमंत्री
| एन. चंद्रबाबू नायडू | टीडीपी | आंध्र प्रदेश | ₹931 कोटी+ | |
| पेमा खांडू | बीजेपी | अरुणाचल प्रदेश | ₹332 कोटी+ | |
| सिद्धारमैया | कांग्रेस | कर्नाटक | ₹51 कोटी+ | |
| नेफ्यू रियो | एनडीपीपी | नागालँड | ₹46 कोटी+ | |
| डॉ. मोहन यादव | बीजेपी | मध्य प्रदेश | ₹42 कोटी+ | |
| एन. रंगासामी | एआई एन.आर. काँग्रेस | पाँडेचरी | ₹38 कोटी+ | |
| अनुमुला रेवंत रेड्डी | काँग्रेस | तेलंगणा | ₹30 कोटी+ | |
| हेमंत सोरेन | जेएमएम | झारखंड | ₹25 कोटी+ | |
| हिमंत बिस्वा सरमा | बीजेपी | आसाम | ₹17 कोटी+ | |
| कॉनराड संगमा | एनपीपी | मेघालय |
|
सर्वात गरीब मुख्यमंत्री
या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात कमी संपत्ती असलेल्या नेत्या आहेत. त्यांनी फक्त 15.38 लाखांची चल संपत्ती जाहीर केली आहे.