Changes in Aadhaar Card : भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आधारकार्ड हे ओळखीचा पुरावा आहे. आज प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड शिवाय कोणतच काम होत नाही. आधारकार्ड एवढा महत्त्वाचा दस्तावेज असताना त्याच्या गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे आधारकार्डच्या सुरक्षेकडे लक्ष देणे ही सरकारची देखील जबाबदारी आहे.
आधारकार्डच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आता त्यात मोठा बदल करण्याचं ठरवलं आहे. नवीन आधार नंबर, कार्डमध्ये नाव आणि पत्ता अशी कोणतीही माहिती नसणार आहे. फक्त फोटो आणि क्यूआर कोड यासह हे आधारकार्ड येणार आहे.
UIDAI ने आधारकार्डच्या सुरक्षेच्या आणि गैरवापर रोखण्याच्या दृष्टीने केवळ फोटो आणि क्यूआरकोड कार्डवर ठेवण्याची योजना आखली आहे.
आधारकार्ड संबंधित एका परिषदेत बोलताना, UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार म्हणाले की, ऑफलाइन पडताळणीला प्रतिबंध करण्यासाठी आणि व्यक्तींची गोपनीयता राखून आधार वापरून वय पडताळणी प्रक्रिया जलद करण्यासाठी प्राधिकरण डिसेंबरमध्ये एक नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
नवीन आधार कार्ड कसे असेल?
कुमार यांनी पुढे म्हटलं की, "आधारकार्डवर अतिरिक्त तपशील का आवश्यक आहेत याचा आम्ही विचार करत आहोत. त्यात फक्त एक फोटो आणि एक QR कोड असावा. जर आम्ही अधिक माहिती छापली तर ज्यांना त्याचा गैरवापर कसा करायचा हे माहित आहे ते असेच करत राहतील." याचा अर्थ असा की आधार कार्डमध्ये आता फक्त तुमचा फोटो आणि एक QR कोड असेल, तुमची सर्व माहिती गोपनीय आणि सुरक्षित राहील.
आधार कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी गोळा करून वापरली किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तरीही, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा करून आपल्याजवळ ठेवतात. यामुळे फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी, आता सर्व आधार माहिती गोपनीय ठेवली जात आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणीवर बंदी घालून, लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world