भारत सरकारने बगलिहार आणि सजल डॅम पूर्णपणे बंद करीत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला आहे. सोमवारी दुपारी काश्मीरच्या रियासी सेक्टरमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी दीड ते दोन फूट खाली पोहोचली. खडकाळ तळ वर दिसू लागला आहे. गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन लोक व्हिडिओ शूट करीत आहेत. सर्वसामान्यांनी पहिल्यांदाच चेनाब नदी पायी चालत पार करीत आहेत. गेल्या कित्येक वर्षात नागरिकांनी चिनाब नदीला अशा अवस्थेत पाहिलं नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयावर जम्मूचे लोक खूश होते आणि याहून मोठ्या कारवाईचे अपेक्षा करीत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
65 वर्षांपूर्वी झाला होता सिंधु करार...
भारत आणि पाकिस्तानदरम्यान 65 वर्षांपूर्वी सिंधु जल करार झाला होता. 1965, 1971 आणि 1999 च्या युद्धादरम्यान भारताने सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणं सुरू ठेवलं होतं. यावरुन सिंधु जल कराराचं महत्त्व लक्षात येऊ शकतं.
नक्की वाचा - Mock Drills : मॉक ड्रिल म्हणजे काय? कशी असते प्रक्रिया? सोप्या भाषेत जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात चिनाब नदीची पातळी दुसऱ्या दिवशी सात फूट खाली घसरली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम आता दिसत आहे. भारताने जम्मूच्या रामबन स्थित बगलियार धरणात चिनाब नदीचे पाणी रोखल्यानंतर सोमवारी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाणी पातळी घटून 15 फूट राहिली. रविवारपेक्षा ती 7 फूट आणखी घटली आहे. चिनाब आटत चालल्याने चार दिवसांनंतर पंजाबच्या 24 महत्त्वाच्या शहरांत 3 कोटींहून जास्त नागरिकांना पाण्यासाठी तडफडवावं लागण्याची चिन्हं आहेत.
फैसलाबाद, मुज्जफरगड चिनीउट आणि हाफिजाबादसारख्या अधिक लोकसंख्येच्या पाकिस्तानी शहरांत 80% लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीवर अवलंबून आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रोखला. त्या करारानुसार सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास नदीच्या पाण्याची पाककडे विभागणी होती.