
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवरील तणाव कमी होण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीत. वाढत्या तणावादरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना 7 मे रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा सराव 244 निवडक जिल्ह्यांमध्ये होईल. याचा उद्देश नागरी संरक्षणाची तयारी किती आहे हे पाहणं आणि ती सुधारणं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन, बस आणि गर्दीच्या भागात मॉक ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल करण्यात येईल. आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे.
मॉक ड्रिल म्हणजे काय?
मॉक ड्रिल हा पूर्व नियोजित अभ्यास असतो. यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रुपांतर केलं जातं. आपत्कालिनक परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे पाहिलं जातं. मॉक ड्रिलदरम्यान कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं. लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते.
नक्की वाचा - Mock Drills : भारत-पाकिस्तान युद्ध छेडणार? उद्यापासून देशभरात सुरक्षा मॉक ड्रिल
मॉक ड्रिल आवश्यक का असतं?
सद्याच्या परिस्थितीत आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास आधीच तयार असणं आवश्यक आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून याची पडताळणी करता येते.
धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात
सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रतिक्रिया देतात.
सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली योग्य पद्धतीने काम करीत आहेत की नाही हे पाहिलं जातं.
कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणेची गरज
मॉक ड्रिलची प्रक्रिया कशी असते?
ठरलेल्या वेळेनुसार अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो
लोकांना परिस्थितीविषयी सांगितलं जातं. (उदा. बॉम्बस्फोटाची किंवा भूकंपाची सूचना दिली जाते)
सर्वात सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं.
फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात.
सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन केलं जातं.
या सर्व गोष्टीला किती वेळ लागला, काय कमतरता होती आणि कशात सुधारणेला वाव आहे, हे पाहिलं जातं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world