Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळात नवरा-नवरी अडकले! रिसेप्शनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लावली हजेरी

जोडप्याने 2 डिसेंबरसाठी भुवनेश्वरहून बेंगळुरूला आणि पुढे हुबळीला जाण्यासाठी इंडिगोची तिकिटे बुक केली होती. मात्र 3 डिसेंबर रोजी ते रद्द करण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indigo Flight Crises

देशात सध्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. असाच एक प्रसंग कर्नाटकातील हुबळीमध्ये घडला. एका नवविवाहित जोडप्याला विमान रद्द झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या रिसेप्शनमध्ये व्हर्चुअली सामील व्हावे लागले.

बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले मेधा क्षीरसागर (हुबळी) आणि संगमा दास यांचा विवाह 23 नोव्हेंबरला भुवनेश्वर येथे झाला होता. वधूच्या गावी, हुबळीतील गुजरात भवन येथे 3 डिसेंबरला त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

इंडिगो विमानसेवा रद्द होण्याचा फटका

या जोडप्याने 2 डिसेंबरसाठी भुवनेश्वरहून बेंगळुरूला आणि पुढे हुबळीला जाण्यासाठी इंडिगोची तिकिटे बुक केली होती. मात्र, मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत त्यांच्या विमानाच्या वेळापत्रकात वारंवार उशीर झाला. अखेरीस 3 डिसेंबर रोजी ते रद्द करण्यात आले. याशिवाय, भुवनेश्वर-मुंबई-हुबळी मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक नातेवाईकांनाही विमानांच्या रद्द होण्याचा फटका बसला.

व्हर्च्युअल रिसेप्शनचा निर्णय

रिसेप्शनसाठी पाहुणे आधीच जमा झाले होते आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. शेवटच्या क्षणी इतक्या मोठ्या समारंभाचे आयोजन रद्द करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत, नवरीच्या आई-वडिलांनी पुढाकार घेतला. त्यांनी नवरी-नवरदेवाच्या खुर्च्यांवर बसून रिसेप्शनचे पारंपरिक विधी पूर्ण केले. दुसरीकडे, मेधा आणि संगमा दास यांनी भुवनेश्वर येथूनच लग्नाच्या पूर्ण वेशात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिसेप्शनमध्ये हजेरी लावली आणि मोठ्या पडद्यावरून पाहुण्यांशी संवाद साधला.

Advertisement

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

वधूची आई भावुक होऊन म्हणाली, पाहुण्यांना निराश करणे शक्य नव्हते. त्यामुळे, कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून आम्ही जोडप्याला ऑनलाइन उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना स्क्रीनवर दाखवले. 

इंडिगोची सेवा का कोलमडली?

इंडिगो एअरलाइन्स देशभरात पायलटच्या कमतरतेमुळे आणि नवीन शासकीय नियमांनुसार अडचणीत सापडली आहे.  दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि इतर शहरांमधील विमानतळांवर विमान वाहतूक ठप्प झाली आहे, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  क्रिकेटरच्या प्रेमात पडली Bigg Boss ची 'ही' स्पर्धक! पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार?)

इंडिगो , जी दररोज सुमारे 2200 उड्डाणे चालवते असे म्हणते, तिने गुरुवारी 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली. जी त्यांच्या 20  वर्षांच्या इतिहासातील एकाच दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे.  इंडिगोने विमान वाहतूक नियामक डीजीसीएला कळवले की, फेब्रुवारी 10, 2026 पर्यंत त्यांचे कामकाज पूर्णपणे स्थिर होण्याची अपेक्षा आहे आणि तोपर्यंत त्यांनी 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता मागितली आहे. या सर्वाचा नाहक मनस्ताप प्रवाशांना होत आहे. 

Topics mentioned in this article