टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री अर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती अफगाणिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आफताब आलम याच्याशी लग्न करण्याची योजना आखत असल्याच्या चर्चा सध्या मनोरंजन आणि क्रिकेट जगतात रंगू लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्शी खान आणि आफताब आलम हे दोघेही आपल्या नात्याबद्दल सिरिअस आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांचे नाते अधिक घट्ट बनले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा साखरपुडा आणि त्यानंतर लग्न होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये याबाबत बोलणी सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दोघांनीही याबद्दल अद्याप सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्यामुळे चाहते आणि मीडियामध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे. चाहते त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीवर आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
रिलेशनशिपबद्दल अर्शीचे विचार
अर्शी खानने यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये रिलेशनशिप्स आणि लग्नाबद्दल आपले विचार मांडले आहेत. तिने वारंवार सांगितले आहे की, तिला एकनिष्ठ साथीदार हवा आहे. मला खात्री नसताना लग्नाची घाई करायची नाही. कमिटमेंट देण्यापूर्वी आपल्या जोडीदाराला पूर्णपणे समजून घेण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे, असं तिचें मत आहे.
(नक्की वाचा- Jahnavi Killekar: "मला दृष्ट कुणी लावली?", जान्हवीचा Insta वर चाहत्यांना सवाल, कमेंटमध्येच मिळालं उत्तर)
कोण आहे आफताब आलम?
आफताब आलम हा अफगाणिस्तानच जलदगती गोलंदाज आहे. त्याचा जन्म 30 नोव्हेंबर 1992 रोजी अफगाणिस्तानमधील नंगरहार येथे झाला. आफताबने अफगाणिस्तानकडून सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले. तो त्याच्या उत्कृष्ट काळात अफगाणिस्तानच्या सर्वात आश्वासक वेगवान गोलंदाजांपैकी एक बनला होता. अर्शी खान आणि आफताब आलमयांच्या चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी होते, याची प्रतीक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world