जाहिरात

Indigo Flight : चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं Mayday Call नंतर इमर्जन्सी लँडिंग, 168 प्रवाशांचा जीव टांगणीवर

Indigo Flight Emergency Landing : गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाची बंगळुरुमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.  

Indigo Flight : चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं Mayday Call नंतर इमर्जन्सी लँडिंग, 168 प्रवाशांचा जीव टांगणीवर
Indigo Flight : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग करण्यापूर्वी वैमानिकांनी 'मेडे कॉल' (Mayday call) केला होता. 
मुंबई:

Indigo Flight Emergency Landing : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. या अपघातामध्ये 241 जणांचा मृत्यू झाला. ही घटना अद्याप ताजी आहे. त्यानंतर आठवडाभरातच  गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाची बंगळुरुमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग करण्यापूर्वी वैमानिकांनी 'मेडे कॉल' (Mayday call) केला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंडिगो विमानाची ही आणीबाणी लँडिंग गुरुवारी झाली. या घटनेनंतर वैमानिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. इंडिगो विमानात इंधनाची तीव्र कमतरता असल्याने त्याला बंगळूरुमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'या' 3 अधिकाऱ्यांना तातडीनं काढा, DGCA चे Air India ला निर्देश )
 

सूत्रांनी असेही सांगितले की, शुक्रवारी मदुराईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात हवेत असताना तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर  पायलटनं चेन्नईला परत येऊन उतरण्याची परवानगी मागितली. विमानात सुमारे 68 प्रवासी होते आणि सर्व प्रवाशांना योग्य सुरक्षा उपायांसह विमानातून उतरवण्यात आले.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

दरम्यान, एअर इंडियाचे बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच आणि कोसळण्यापूर्वी काही वेळ आधी 'मेडे कॉल' करण्यात आला होता.  पण, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर हे विमान अहमदाबाद विमानतळजवळील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकलं. त्यामध्ये 241 जणांचा मृत्यू झाला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com