अनोखं गाव! 'या' गावातल्या महिला झाडालाच मानतात आपला पती तर कोणी...

गावातल्या महिलांनी झाडांनाच आपला पती मानला आहे. तर काहींनी मित्र, वडील, तर कोणी भाऊ बहिणही मानलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
रायपूर:

असं एक गाव आहे ज्या गावातील लोकांचं झाडां बरोबर अनोखं नातं आहे. ते लोक या झाडांबरोबर बोलतात, त्यांच्या बरोबर आपली सुख:दुख: वाटतात. गावातल्या महिलांनी झाडांनाच आपला पती मानला आहे. तर काहींनी मित्र, वडील, तर कोणी भाऊ बहिणही मानलं आहे. हे गाव आहे छत्तीसगडमधील पिसेगाव... या गावाची ओळख पर्यावरणपुरक गाव म्हणून आहे. या गावातील लोकांचे झाडां बरोबर अनोखं नातं आहे. त्यामुळे या गावाची आणि या गावातल्या लोकांचे झाडा सोबत असलेल्या संबधांची चर्चा आता सर्वत्र होत आहे. 

छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून हे गाव 60 किलोमिटर दूर आहे. शिवनाथ नदीच्या किनाऱ्यावर हे गाव आहे. या गावात गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात असल्याचे वाटते. या गावात उपवन बनवण्यात आले आहे. या उपवनात अनेक झाडे आहेत. या झाडांबरोबरच गावातल्या लोकांनी एक अनोखं नातं निर्माण केलं आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 

Advertisement

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुमारी बाई देशमुख. त्या याच गावच्या आहेत. त्या नियमित या वनात जातात. यावनात एक लिंबाचे झाड आहे. या झाडाला त्यांनी आपला पती मानलं आहे. त्या या झाडाला नेहमी भेटतात. त्या झाडाबरोबर त्या बोलतात. झाडाला अलिंगण देतात. पतीच्या निधनानंतर त्या याच झाडा जवळ यायच्या. आपलं मन मोकळं करायच्या. मुलांना मोठं करावं अशी पतीची इच्छा होती. त्यानुसार मुलांना मोठं केलं. त्यांचे विवाह केले. पण फक्त कमी होती ती त्यांच्या उपस्थितीची असं कुमारी बाई सांगतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कारगिल युद्धात गमावले 2 पाय आणि 1 हात, नाशिकचे 'नायक' आजही देतायत सर्वांना प्रेरणा

कुमारी बाई यांच्या प्रमाणे गावातल्या अनेक लोकांनी या झाडां बरोबर आपले नाते जोडले आहे. गावात काही वर्षापूर्वी मधू या लग्न करून आल्या होत्या. त्यांनीही या उपवनात एक झाड लावलं आहे. त्या या झाडाला आपली आई मानतात. मधू या झाडाची देखभाल करतात. या झाडाला भेटण्यासाठी रोज वनात येतात. त्या झाडाबरोबर बोलतात. आपल्या आई बरोबरच आपण बोलत आहोत असं त्यांना वाटतं. मधू यांच्या आईचं 14 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सारा अली खानसोबत काय घडलं? विमान प्रवासात संतापली अभिनेत्री, Inside Video

या गावात एक तरूण होता. त्याचं नाव सुर्यकांत गुप्ता असे होते. समाज सेवा करण्यात तो नेहमीच पुढे असायचा. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचा मृत्यू झाला. लोकांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी तो मोफत मास्क, सॅनिटायझर वाटप करायचा. त्याच्या आठवणीत गावातल्या लोकांनी या वनामध्ये त्याच्या नावाचे पिंपळाचे झाड लावले. ते झाड आता मोठे होत आहे. आपला मित्रही त्यामुळे मोठा होतोय असं इथले लोक मानतात. 

ट्रेंडिंग बातमी - नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...

पिसेगावातले हे अनोखे नाते सर्वत्र चर्चीले जात आहे. पण ही संकल्पा पुढे आली कशी याची माहिती गावकरी रमाकांत देशमुख यांनी दिली आहे. सर्व गावकरी हे गायत्री परिवाराशी जोडले गेले आहेत. या परिवाराचे प्रमुख आचार्य पंडित श्रीराम शर्मा यांची 2011 मध्ये जन्मशताब्दी झाली. त्यावेळी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. झाडे लावली जातात. पण ती जगवली जात नाहीत. त्यावेळी या अनोख्या नात्याची संकल्पाना पुढे आली. झाडा बरोबर नाते जोडले गेले. त्यातून झाडं ही जगली आणि नाते ही बहरले. आता जर कोणाचा वाढदिवस असेल, स्मृती दिवस असेल तर झाडे लावली जातात. त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. वनामध्ये झाडं लावली जात असल्याने गावाला पुरा पासून संरक्षणही मिळाले आहे.