जाहिरात

Gandhi Family: गांधी परिवाराच्या कपाळावरील 'तो' लाल टिळा कसला? महाराष्ट्र कनेक्शन आले समोर

मुख्यमंत्री सतीशन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

Gandhi Family: गांधी परिवाराच्या कपाळावरील 'तो' लाल टिळा कसला? महाराष्ट्र कनेक्शन आले समोर

केरलमचे नवे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी आज सकाळी काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील उपस्थित होते. '10 जनपथ'वरून समोर आलेल्या या भेटीच्या फोटोंमध्ये एक विशेष गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा लावलेला दिसत आहे. मात्र सतीशन यांच्या कपाळावर तो नाही. त्यामुळे या लाल टिळ्या मागचं राज का याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली. 

साधारणपणे कोणत्याही नेत्यासोबतच्या औपचारिक भेटीदरम्यान गांधी कुटुंबातील सदस्य अशा प्रकारे कपाळावर चंदन किंवा टिळा लावलेले पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाली होती. काही वेळा चंदन टिळा लावताना गांधी कुटुंबी पाहीलं गेलं आहे. मात्र, काँग्रेस हाय कमांडच्या निकटवर्तीयांनी यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे गांधी कुटुंबियांच्या कपाळावर हा टिळा लागला आहे.

नक्की वाचा - Pune News: पावभाजीमध्ये सापडला जिवंत किडा! हिंजवडीच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार Video Viral

माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि शरद पवार यांच्या नात रेवती सुळे यांचा विवाह लवकरच संपन्न होणार आहे. याच लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सुप्रिया सुळे '10 जनपथ' येथे पोहोचल्या होत्या. लग्नपत्रिका देताना त्यांनी पारंपरिक पद्धतीने गांधी कुटुंबातील सदस्यांना हा टिळा लावला. या वेळी सोनीया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होत्या. यानंतर सुप्रिया सुळे पत्रिका देवून निघून गेल्या. पुढे केरळचे मुख्यमंत्री सतीशन त्यांच्या भेटी वेळी आले होते. त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर लाल टिळ्याची चर्चा रंगली. 

नक्की वाचा - Positive news: पुस्तके वाचा अन् शिक्षा कमी करा! 'या' देशात कैद्यांना दिली जाते खास सवलत, भारतातला नियम काय?

सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा 20 जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. पवार आणि गांधी कुटुंबाचे राजकारणापलीकडे अत्यंत जवळचे आणि वैयक्तिक संबंध आहेत. म्हणूनच सुप्रिया सुळे यांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने हे आमंत्रण दिले. दरम्यान, आपल्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री सतीशन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com