Interesting story : तुफान पावसात घराच्या अंगणात 40 वर्षे जुनं झाड कोसळलं; 85 वर्षीय वृद्धाचं नशीबच चमकलं!

केसरीसाठी एक कोसळलेलं झाड आयुष्याला कलाटणी देणारी बातमी ठरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Interesting story : सर्वसाधारणपणे पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याची वृत्त वारंवार येत असतात. यामुळे मोठं नुकसानही होतं. मात्र केसरीसाठी एक कोसळलेलं झाड आयुष्याला कलाटणी देणारी बातमी ठरली आहे. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल ४० वर्षांपासून उभं असलेलं चंदनाचं झाड तुऱान पाऊस आणि वादळामुळे कोसळलं. मात्र याच झाडाने त्यांना तब्बल २८ लाखांचा मालक बनवलं. इतकच नाही सरकारने त्याच्यातील धैर्य आणि झाडाच्या संरक्षणासाठी त्यांचा 'सँडलवूड शिरोमणी' सन्मानाने गौरव केला.

साधारण चार दशकांपूर्वी त्यांच्या घराच्या अंगणात आपोआप एक चंदनाचं झाड उगवलं होतं. केसरी यांनी त्याची काळजी घेतली आणि हळूहळू त्या झाडाने विशाल रुप घेतलं. याचा सुगंध लांबपर्यंत पसरला. मात्र यामुळे अनेक चोरट्यांनी झाडाला लक्ष्य केलं. झाड वाचविण्यासाठी त्यांनी चहूबाजूने लोखंडाचा मजबूत पिंजरा लावला. 

Advertisement

नक्की वाचा - Sindhudurg News : रात्रीची वेळ...नदीचं रौद्र रुप, अंदाज चुकला अन्...; वेदांतने कशी दिली मृत्यूला हुलकावणी?

तातडीने वन विभागाला दिली सूचना...

यंदाच्या पावसात तुफान पाऊस आणि वादळामुळे जवळील एक झाड चंदनाच्या झाडावर कोसळलं. यामुळे चंदनाचं झाड मूळापासून उन्मळून पडलं. केसरी यांनी नियमाचं पालन करीत वन विभागाला याची सूचना दिली. विभागाच्या परवानगी नंतर झाडाला मैसूर स्थित सरकारी चंदन डेपोत पाठविण्यात आलं. येथे झाडाचं वजन तब्बल एक टनपर्यंत पोहोचलं. 

पुरस्कार देऊन केला सन्मान..

कर्नाटक सोप्स अँड डिटर्जेंट्स लिमिटेडने हे चंदन खरेदी केलं. ज्यामध्ये केसरी यांना तब्बल २८ लाखांची रक्कम देण्यात आली. वर्षांपर्यंत चंदनाच्या झाडाची सुरक्षा आणि संरक्षणासाठी राज्य सरकारने त्यांना सँडलवूड शिरोमणि पुरस्कार देऊन सन्मानित केलं. News18 हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.