Viral News : तो iPhone देवाचा, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे वादंग

iPhone Drops in Hundi : दान पेटीत काही पैसे टाकण्यासाठी ते गेले. त्यावेळी त्यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला त्यांचा आयफोन पैसे काढताना चुकून दानपेटीत पडला. दानपेटी खोल असल्याने त्यांना फोन काढता आला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

भक्ताचा चुकून दानपेटीत पडलेला iPhone परत देण्यास मंदिर प्रशासनाने नकार दिला आहे. चेन्नईजवळील थिरुपूर येथील अरुल्मिगु कंदास्वामी मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिरानेही फोनला आपली मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे देवाच्या दरबारी गेलेल्या भक्ताना मोठ्या मनस्तापाला सामोर जावं लागलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनयगापुरम येथील भक्त दिनेशला शुक्रवारी रिकाम्या हाताने घरी परतावे लागले कारण मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हुंडीत टाकलेली कोणतीही गोष्ट देवाची आहे. मात्र, त्यांनी त्याला सिमकार्ड देऊन फोनवरून डेटा डाउनलोड करण्याची ऑफर दिली.

(नक्की वाचा-  Viral X Post : फ्रेशरने 'सर' म्हटलं नाही, सिनिअरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं...)

झालं असं की, दिनेश हे महिनाभरापूर्वी कुटुंबासमवेत अरुल्मिगु कंदास्वामी मंदिरात गेले होते. पूजा झाल्यानंतर दान पेटीत काही पैसे टाकण्यासाठी ते गेले. त्यावेळी त्यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला त्यांचा आयफोन पैसे काढताना चुकून दानपेटीत पडला. दानपेटी खोल असल्याने त्यांना फोन काढता आला नाही.

यावेळी दिनेश यांनी मंदिर प्रशासनासी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकर मंदिर प्रशासनाला साधला. तेव्हा मंदिर प्रशासनाने त्यांना सांगितलं की, एकदा दानपेटीत अर्पण केलेली कोणतीही वस्तू देवाची संपत्ती मानली जाते आणि ती परत करता येत नाही. शिवाय परंपरेनुसार दोन महिन्यातून एकदाच दानपेटी उघडली जाते.

Advertisement

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

दानपेटी उघडली पण...

मंदिर प्रशासनाने सहकार्य न केल्याने दिनेश यांनी हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डॉवमेंट अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. अखेर शुक्रवारी मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दानपेटी हुंडी उघडली, मात्र त्यांना फोन दिला नाही. दिनेश यांना फोनमधील सीमकार्ड आणि इतर डेटा देण्यात आला. मात्र फोन मंदिर प्रशासनाने ठेवून घेतला.

मंदिर प्रशासनाने काय म्हटलं?

मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी सांगितले की, दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू मंदिर आणि देवतेची मानण्याची परंपरा पाळली जाईल आणि फोन मंदिराजवळच ठेवला जाईल. दिनेश यांनी फोन अर्पण केला आणि नंतर त्यांचा विचार बदलला की नाही हे आम्हाला स्पष्ट नाही. 
 

Advertisement

Topics mentioned in this article