अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. यशानं हुरळून जायचं नसतं आणि अपयशानं खचून जायचं नसतं. प्रयत्न केला तर यश हे मिळतचं. त्याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातल्या मालवे गावात आलाय. या गावात राहाणाऱ्या रोहित पाटील या तरुणानं यशाला अशी गवसणी घातली आहे की त्याची चर्चा जिल्ह्यातच नाही तर राज्यात होत आहे. कोल्हापुरच्या या तरुणाची थेट इस्त्रोत शास्त्रज्ञम्हणून निवड झाली आहे. पण इथ पर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांने आपले स्वप्न साकार केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित पाटील हे राधानगरी तालुक्यातील मालवे या छोट्याशा गावचे रहिवाशी आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती. पण मुलाने शिकावं,नाव कमवावं, खूप मोठं व्हावं त्यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे कितीही आर्थिक संकटे आली, तरी कुटुंबाने रोहित यांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. आई-वडिलांच्या याच संघर्षाला यशाचे कोंदण रोहित यांनी लावलं.
राधानगरीतल्या मालवे येथील रोहित विद्या लक्ष्मण पाटील यांनी थेट 'इस्रो 'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून झेप घेतली आहे. मालवेसारख्या आडवळणाच्या गावातील या मुलाने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. शिवाय लेकाने मिळवलेल्या यशामुळे रोहितचे आई वडिलही खुष आहेत. त्यांना लेकाच्या यशामुळे आभाळ ठेंगणं वाटत आहे. आई वडिलांचे परिश्रम आणि लेकाची मेहनत यामुळे रोहित 'इस्रो 'जावू शकला.
रोहितचं प्राथमिक शिक्षण मालवे विद्यामंदिर, बोरवडे हायस्कूल व किसनराव मोरे हायस्कूल सरवडे येथे झालं. तर गारगोटीच्या आयसीआरई कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. इचलकरंजी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी याच विषयातून डिग्री पूर्ण केली. त्यानंतर काही काळ शिरवळच्या एका कंपनीत नोकरी ही केली. पण त्यात त्यांचं मन लागत नव्हतं. काही तरी वेगळं केलं पाहीजे हे सतत त्यांना वाटत होतं.
त्यातूनच पुढे त्यांना स्पर्धा परीक्षेचे वेध लागले. रोहितने ऑइल आणि नॅचरल गॅस या केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअरपदी निवड झाली. हे करत असताना त्यांनी 'इस्त्रो'ची परीक्षा ही दिली. 'इस्रो 'बाबत पहिल्या पासून आकर्षण होतं. त्यामुळे तिथं नोकरी मिळवायचीच या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. पण त्यातून ते खचून गेले नाहीत. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. एक दिवस यश मिळेलच असा विश्वास त्यांना होता. शेवटी त्यांचा विश्वास खरा ठरला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने त्यांची 'इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून शेवटी निवड झाली. त्यांचे स्वप्न साकार झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world