जाहिरात

IRCTC AI Cameras: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता IRCTC च्या बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा पहारा

IRCTC AI Cameras: भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना आता प्रवासात अधिक दर्जेदार आणि स्वच्छ जेवण मिळणार आहे. IRCTC ने देशभरात किचनवर 2394 एआई (AI) कॅमेऱ्यांद्वारे 24 तास नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

IRCTC AI Cameras: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता IRCTC च्या बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा पहारा
  • IRCTC ने देशभर के 800 से ज्यादा किचन में AI कैमरों से खाना बनाने की प्रक्रिया की सख्त निगरानी शुरू की है
  • AI सिस्टम गंदगी, हेयरनेट न पहनने, सफाई और कीटों समेत 9 तरह की गलतियों की पहचान करता है
  • हर दिन औसतन 350 अलर्ट मिलते हैं, जिनमें से उत्तर क्षेत्र में सबसे ज्यादा 4123 गड़बड़ियों के अलर्ट होते हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

रेल्वे स्थानकांवर आणि चालत्या ट्रेन्समध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असतात. मात्र, आता प्रवाशांना दर्जेदार आणि स्वच्छ जेवण मिळावे यासाठी IRCTC ने एक अत्यंत मोठे आणि हायटेक पाऊल उचलले आहे. देशभरातील रेल्वेच्या बेस किचनवर आता थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कॅमेऱ्यांद्वारे 'राउंड द क्लॉक' म्हणजेच 24 तास कडक नजर ठेवली जात आहे. दिल्लीतील केंद्रीय वॉर रूममधून या संपूर्ण प्रक्रियेचे मॉनिटरिंग केले जात आहे.

800 हून अधिक किचनवर 2394 कॅमेऱ्यांची नजर

देशभरात पसरलेल्या IRCTC च्या 800  पेक्षा जास्त बेस किचनमध्ये तब्बल 2394 एआय-आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे केवळ चित्रीकरण करत नाहीत, तर जेवण बनवताना होणाऱ्या 9 प्रकारच्या विशिष्ट चुका किंवा अस्वच्छता स्वयंचलितपणे शोधून काढतात. 

Add image caption here

Add image caption here

कोणत्या गोष्टींवर नजर असणार?

  • स्वयंपाकी आणि कर्मचाऱ्यांनी हेअरनेट आणि पारदर्शक ग्लव्स न घालणे.
  • किचनमधील अस्वच्छता आणि योग्य प्रकारे पोछा न मारणे.
  • अन्न उघडे किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवणे.
  • किचनमध्ये उंदीर, माश्या आणि झुरळांचा वावर असणे.

या तंत्रज्ञानाची अचूकता इतकी जबरदस्त आहे की, जेवणात पडलेला 7 ते 8 मिलीमीटर इतका लहान कीटकही हे कॅमेरे सहज पकडू शकतात.

(नक्की वाचा-  VIDEO: 25 रुपये कशाचे घेता? रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का? महिलेचा रुद्रावतार, कर्मचाऱ्यांना झाप झाप झापलं)

गड़बड झाल्यास 2 तासांत ॲक्शन

किचनमध्ये कोणत्याही प्रकारचा नियमभंग किंवा अस्वच्छता आढळल्यास, एआय सिस्टम थेट संबंधित किचन मॅनेजरला सतर्कतेचा मेसेज पाठवते. जर ठराविक वेळेत त्यात सुधारणा झाली नाही, तर हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो. सामान्यतः चूक आढळल्यास दोन तासांच्या आत जबाबदार व्यक्ती किंवा कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाते. सध्या या प्रणालीद्वारे दररोज सरासरी 350 अलर्ट मिळतात. गेल्या एका महिन्यात एकूण 13,550 अलर्ट मिळाले असून, यामध्ये सर्वाधिक 4123 अलर्ट उत्तर क्षेत्रातून, तर सर्वात कमी 1209 अलर्ट दक्षिण क्षेत्रातून मिळाले आहेत.

Latest and Breaking News on NDTV

10 टक्के अलर्ट तांत्रिक चुकीचे

एआय यंत्रणा अतिशय कडकपणे काम करत असली, तरी काही वेळा तांत्रिक रचनेमुळे अंदाजे 10% चुकीचे अलर्ट देखील येतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या आचाऱ्याने हेअरनेट घातले असेल, परंतु ते डोक्यावरून थोडे वर सरकले असेल, तरीही एआय त्याला नियमभंग मानून अलर्ट जारी करते.

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

रेल्वे कॅटरिंगची सद्यस्थिती आणि आकडेवारी

सध्या 1453 ट्रेन्समध्ये जेवणाची सेवा दिली जात आहे. यात 60 कोटी प्रवाशी वर्षाला या सेवेचा लाभ घेतात. 5 वर्षांत एकूण 19,000 पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  IRCTC ने आता गुणवत्तेच्या बाबतीत कमालीची कडक भूमिका घेतली आहे. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खराब दर्जाचे दही दिल्याबद्दल IRCTC वर 10 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर संबंधित ट्रेनमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या मुख्य कंपनीला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com