जाहिरात

Jammu And Kashmir: आई वडील अन् 3 मुले, घरात आढळले एकाच कुटुंबातील 5 मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

श्वास गुदमरुन या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Jammu And Kashmir: आई वडील अन् 3 मुले, घरात आढळले एकाच कुटुंबातील 5 मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

जम्मू- काश्मिर: जम्मू- काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आई वडील आणि तीन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. श्वास गुदमरुन या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या काश्मिरच्या खोऱ्यात थंडीचा उच्चांक पाहायला मिळत असून नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अशातच याच थंडीने हसत्या खेळत्या कुटुंबाचा जीव घेतल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.   जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये एकाच कुटुंबातील 5 लोक त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही धक्कादायक घटना श्रीनगरच्या पांडराथन भागात घडली, जिथे पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा गुदमरल्याने दुःखद मृत्यू झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नगरच्या पांडरथन भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरल्याने बेशुद्ध पडल्यानंतर संध्याकाळी उशिरा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मूळचे बारामुल्ला येथील रहिवासी असलेले हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, तर तपास सुरू करण्यात आला आहे.

हिवाळ्यात गॅस हिटर आणि उघड्या कोळशावर चालणारी उपकरणे वापरल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडमुळे विषबाधा होते, त्यामुळेच मृत्यू होतात. हवामान खात्याने येत्या 24 तासांत काश्मीर प्रदेशात आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याने अधिकाऱ्यांनी लोकांना खुल्या ज्वालाची साधने वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

नक्की वाचा - OYO Hotel Booking : OYO मध्ये अविवाहित जोडप्याला NO Entry; Check-in पॉलिसीमध्ये मोठे बदल

दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पारा गोठणबिंदूच्या जवळ राहिला.  काश्मीरमधील बांदीपोरा, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांतील अनेक भागात आणि मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गंदरबल जिल्ह्याच्या काही भागात सकाळी बर्फवृष्टी झाली. खोऱ्यात रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग शहरात ते उणे ८.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com