Jammu Kashmir News : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं शोध अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत अनेक संशयास्पदांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान काश्मीरच्या कुलगाममध्ये एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी कुलगाममध्ये तंगमार्ग येथील 22 वर्षीय इम्तियाज अहमद मागरेचा मृतदेह अदबदल नाल्याजवळ सापडला. मागरेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी त्याला सैन्याने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला याचा न्यायालयीन तपास व्हावा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांचा दावा काय आहे?
पोलिसांच्या माहितीनुसार, मागरे हा एक ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) होता आणि त्याने लष्कराला दहशतवाद्यांचे एक ठिकाण दाखवले होते. दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याने नाल्यात उडी मारली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे. या घटनेचा एक ड्रोन फूटेजही जारी करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मोठी अपडेट; या 2 मुद्द्यांवरून करणार तपास
कुलमागमधील इम्तियाज अहमद मागरेने कशा प्रकारे नाल्यात उडी मारली
महबुबा मुफ्तींकडून न्यायालयीन तपासाची मागणी..
पीडीपीच्या अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मु्फ्ती यांनी या प्रकरणात बांदीपूरा आणि कुपवाडामध्ये झालेले मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत न्यायालयीन तपासाची मागणी केली आहे.