जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 4 जवान हुतात्मा, 6 जखमी

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठूआ जिल्ह्यात दहशतवादी आणि सैन्यात सोमवारी मोठी चकमक झाली.

Advertisement
Read Time: 2 mins
J
मुंबई:

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठूआ जिल्ह्यात दहशतवादी आणि सैन्यात सोमवारी मोठी चकमक झाली. या चकमकीत 4 जवान हुतात्मा झाले तर 6 जखमी झाले आहेत जम्मू काश्मीरमधील कठूआ जिल्हा पंजाबमधील पठाणकोटला लागून आहे. याबाबत सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून पहिल्यांदा हल्ला करण्यात आला. सैन्यानं त्याला उत्तर दिलं. कठूआ शहरापासून 150 किलोमीटर दूर लोहाई मल्हार येथील बदनोता गावात हा हल्ला झाला. काही सैनिकी वाहनं या भागात नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दहशतवाद्यांनी सुरुवातीच्या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. सुरक्षा दलानी त्याला उत्तर दिलं. त्यावेळी दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. 

सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरु

दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याकडून या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांच्या संशयित ठिकाणांचा सैन्याकडून शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कठूआ आणि जम्मूच्या जवळच्या परिसरात दहशतवाद्यांकडून सातत्यानं हल्ले होत आहेत. 

कुलगाममध्ये झाली होती चकमक

जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन ठिकाणी सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्यात ठार मारण्यात आलेल्या एका दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये एका घरामध्ये दहशतवाद्यांनी गुप्त ठिकाण बनवण्यात आल्याचं दिसत होतं. गेल्या काही दिवसात कुलगाम जिल्ह्यात हिजबूलचे 6 दहशतवादी ठार झाले तर 2 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यात ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत मिळत होती, असा सुरक्षा दलाचा दावा आहे. याबाबत सध्या तपास सुरु आहे. 

( नक्की वाचा : चीन पुन्हा गडबड करण्याच्या तयारीत? सॅटेलाईट इमेजमधून धक्कादायक गौप्यस्फोट )
 

जम्मू काश्मीरमध्ये 9 जून रोजी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबाप केला होता. या गोळीबारात बस दरीत कोसळली. दहशतवाद्यांचा गोळीबार आणि बस दरीमध्ये पडल्याच्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाले. बसमधील भाविक ओरडत होते. त्यानंतरही दहशतवादी त्यांच्यावर गोळीबार करत होते. दहशतवाद्यांनी लहान मुलांवरही गोळीबार केला होता. 

Advertisement

( नक्की वाचा : बस दरीत पडली, तरी गोळीबार सुरुच होता! भाविकांनी सांगितला भयंकर अनुभव )
 


 

Topics mentioned in this article