जाहिरात

चीन पुन्हा गडबड करण्याच्या तयारीत? सॅटेलाईट इमेजमधून धक्कादायक गौप्यस्फोट

India - China Border Issue : भारत आणि चीन यांच्यात गेल्या 6 दशकांपेक्षा जास्त काळापासून सीमा प्रश्न धुमसत आहे.

चीन पुन्हा गडबड करण्याच्या तयारीत? सॅटेलाईट इमेजमधून धक्कादायक  गौप्यस्फोट
India - China Border Issue
मुंबई:


India - China Border Issue : भारत आणि चीन यांच्यात गेल्या 6 दशकांपेक्षा जास्त काळापासून सीमा प्रश्न धुमसत आहे. दोन्ही देशांचे सैनिक एलएसीवर गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा आमने-सामने आले आहेत. त्यातच पँगाँग तलावाच्या दुसऱ्या बाजूला चीन मोठी काम करत असल्याचा गौप्यस्फोट एका सॅटेलाईट इमेजमधून झाला आहे.ड्रॅगनच्या या कारवायांबाबत एनडीटीव्ही लडाखचे खासदार मोहम्मद हनीफा यांच्याशी खास चर्चा केली. त्यावेळी आपण बॉर्डरवर पायाभूत सुविधा वेगानं तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चीन पुन्हाही करणार...

लडाखचे खासदार मोहम्मद हनीफा यांनी सांगितलं की, 'चीननं या प्रकारचं कृत्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. चीननं यापूर्वी देखील अनेकदा हे केलं आहे. ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही. चीन पुढंही या प्रकारचं कृत्य करेल, हे नाकारता येत नाही. आपल्या बॉर्डरवरील पायाभूत सूविधा आणखी मजबूत करायला हव्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये यावर काम झालंय. पण, या दिशेनं वेगानं आणि आणखी काम करण्याची गरज आहे.'

हनीफा यावेळी म्हणले की, 'भारत आणि चीनमधील सीमा विवाद बऱ्याच काळापासून सुरु आहे. या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. आम्ही बॉर्डरवरची लोकं आहोत. युद्धाची परिस्थिती कशी असते याची आम्हाला जाणीव आहे. लडाखच्या परिसरात शांतता नांदावी, अशी आमची इच्छा आहे. येथील लोकं खूप शांत आहेत. एलओसी किंवा एलएसीबाबत जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर दोन्ही देशांनी चर्चेतून शोधलं पाहिजे.'

( नक्की वाचा : UK Election Results 2024 : ऋषी सुनक यांचा पराभव ब्रिटनमधील भारतीयांनीच केला? )
 

चीन आमची गुरं अडवत आहे.

भारतीय सैन्याच्या धैर्याचं कौतुक करताना मोहम्मद हनीफा यांनी सांगितलं, 'भारतीय सैन्य बॉर्डरवर चीनी सैन्यासमोर अत्यंत भक्कपणे उभं आहे. इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी समर्थ आहे. पण, युद्धामुळे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. परराष्ट्र धोरण देखील आवश्यक आहे. चर्चेतूनच प्रश्न सुटले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून गलवान खोरं तसंच आसपासच्या भागात चाऱ्यासाठी ज्या जागा आहेत तेथील लोकं अत्यंत त्रस्त आहेत. चीन या भागात सतत कुरापती करत आहेत. आपल्या गुरांना अडवत आहे. पेंगोंग तलावाच्या परिसरातही अनेक ठिकाणी चीन पुढं आल्याच्या बातम्या आहेत.'


जोजिला बोगदा लवकर सुरु करण्याची गरज

चीनच्या कुरापतीबद्दल बोलताना हनीफा म्हणाले,'चामथांग भागातील बॉर्डवरील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहे. तेथील लोकांना त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांना चारता येत नाही. लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्या भागात सरकारला बरंच काही करण्याची गरज आहे. जोजिला बोगदा लवकर सुरु करण्याती आवश्यकता आहे. ही लोकांची लाईफलाईन आहे. चीनवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही. 

( नक्की वाचा : PM मोदी आणि पोप यांचा फोटो शेअर करुन फसली काँग्रेस, माफी मागण्याची आली वेळ )
 

चीनचं धोरण सरकारला माहिती आहे.लडाखमध्येच नाही तर अन्य भागातही त्याचं तेच धोरण आहे. स्थानिक नागरिक आणि सैन्याबाबत चीनचं धोरण जगजाहीर आहे. लडाखच्या नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची साथ दिलीय. ते पुढंही देत राहतील.' 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाकिस्तान सैन्याची सार्वजनिक कबुली, 25 वर्षांनंतर कारगिल युद्धातील सहभाग मान्य
चीन पुन्हा गडबड करण्याच्या तयारीत? सॅटेलाईट इमेजमधून धक्कादायक  गौप्यस्फोट
MLA disqualification case hearing in Supreme court Uddhav Thackeray also in Delhi Big events in the delhi today
Next Article
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, उद्धव ठाकरेही दिल्लीत; आज राजधानीत मोठ्या घडामोडी