निवृत्त DSP च्या घरात अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू, झोपेतच कुटुंब संपलं

मध्यरात्री गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

जम्मू- काश्मिर: जम्मू काश्मिरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी भीषण आग लागली. मध्यरात्री गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. कठुआ येथील शिवानगरमध्ये एका घराला लागलेल्या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लोक बेशुद्ध झाले आहेत. घरामध्ये 9 जण झोपलेले असताना आग लागली अन् ही भयंकर घटना घडली. जखमी झालेल्या सर्वांवर कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गंगा भगत- (वय 17 वर्षे), दानिश भगत- (वय 15 वर्षे), अवतार कृष्ण- (वय 81 वर्षे), बरखा रैना- (वय 24 वर्षे), तकश रैना- (वय 3 वर्षे) अद्विक रैना- (वय 4 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेला शेजारीही गंभीर जखमी झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.  या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

नक्की वाचा - उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ काय? 

Topics mentioned in this article