Jammu Kashmir Election Result : कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू काश्मीर भाजपवर नाराज?

Jammu and Kashmir Election Results 2024 Live Updates : मात्र 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येथे डोंगराळ आणि मैदानी भागातून वेगवेगळा निकाल दिसतोय.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

जम्मू काश्मीरमध्ये 2014 मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. येथे विधानसभा (Jammu and Kashmir Elections Result) निवडणुकीची घोषणा केली त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये नवी 'लहर' पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येथे घाटी आणि मैदानी भागातून वेगवेगळा निकाल दिसतोय. जम्मूमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा पाहायला मिळत आहे तर घाटीवर काँग्रेसची छाप दिसत आहे. 

जम्मू काश्मीरच्या एकूण 90 विधानसभा मतदारसंघांत दुपारी 1 वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स 52 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागा, पीडीपी दोन जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय 9 अपक्ष आघाडीवर आहे. 

जम्मूमधील 43 जागांपैकी 24 जागांवर भाजप तर काँग्रेस युतीतील 12 जागा आघाडीवर आहे. येथे पीडीपीचं खातं उघडताना दिसत नाही. तर येथील सात जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. दुसरीकडे काश्मीरच्या 47 जागांपैकी 35 जागांवर काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स युतीचा करिष्मा पाहायला मिळत आहे. येथे भाजप केवळ चार जागांवर आघाडीवर आहे. तर चार जागांवर पीडीपी पुढे-मागे होताना दिसत आहे. याशिवाय चार जागा अपक्षांना मिळताना दिसत आहे. 

नक्की वाचा - निवडणूक निकाल 2024 LIVE Updates : हरियाणा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार? जाणून घ्या आताचे कल


भाजपचा मिशन जम्मू फेल?
भाजपचे सध्याचे कल पाहता भाजपचा मिशन जम्मू पूर्णपणे फेल झालं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण 111 जागा होत्या. 

जम्मू काश्मीर - एकूण 111 जागा
काश्मीर - 46
जम्मू - 37
लडाख - 4
पीओके - 24

लडाख वेगळं झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 107 जागा झाल्या. त्यानंतर सीमा भागातील बदलानंतर जम्मू काश्मीरमध्ये 114 जागा झाल्या. त्यात 90 जागा जम्मू काश्मीर आणि 24 जागा पीओकेमध्ये ठेवण्यात आल्या. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 43 जागा जम्मूत आणि 47 जागा काश्मीरच्या खात्यात गेल्या, नव्या सीमा बदलानुसार जम्मू सहा जागा वाढल्या तर काश्मीरमध्ये एक जागेत वाढ झालीय. 

नक्की वाचा - हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र

जम्मू काश्मीरमध्ये गोंधळ?
जम्मू काश्मीरमधील आतापर्यंत सर्व निवडणुकांकडे लक्ष देऊन पाहिलं तर काँग्रेसशिवाय नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. तर जम्मूमधील मैदानी भागात भाजपचं प्रभूत्व पाहायला मिळत होतं. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरची जनता एकतर्फी फैसला देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निकाल तसा आला नाही 

2019 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटविण्यात आलं होतं. यानंतर जम्मू काश्मीरला दिला जाणार विशेष राज्याचा दर्जा हटवून तो केंद्र शासित प्रदेशात परावर्तित करण्यात आला होता. सोबतच लडाख त्यांच्यापासून वेगळा करण्यात आला होता. 

दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती यांची पीडीपीही फारसा करिष्मा दाखवू शकली नाही. मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती बिजबेहरा मतदारसंघातून पिछाडीवर आहे. त्यांना आपला गडही राखला आला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपने ज्या गोष्टीचा देशभरात गवगवा केला त्या 370 हटवल्याच्या निर्णयाचा जम्मू काश्मीरमध्ये फारसा परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे.