Haryana Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकांचे कल समोर येताच अनेक निवडणूक विश्लेषकांची धांदल उडाली. निकालांपूर्वी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच एग्झिट पोलमध्ये काँग्रेलला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, प्रत्यक्षात सलग तिसऱ्यांदा राज्यात भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. सकाळी 9 पर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते. पण, 9 नंतर चित्र बदलण्यास सुुरुवात झाली. 11 नंतरच्या कलांनुसार भाजपाला बहुमत मिळालं होतं. राजकीय विश्लेषकांचा अंदाज चुकवणाऱ्या भाजपाच्या या विजयात एक फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपानं कसं बदललं चित्र?
भाजपानं काही तासांमध्ये चित्र कसं बदललं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भाजपाच्या विजयाचं विश्लेषण केल्यानंतर यामधील एक महत्त्वाचा फॅक्टर समोर आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांनी दिलेला कौल भाजपाच्या विजयातील महत्त्वाचं कारण ठरलं आहे.
आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनुसार हरियाणामधील 30 शहरी मतदारसंघांपैकी 21 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. जवळपास 70 टक्के शहरी मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवलाआहे. तर काँग्रेसला फक्त 7 शहरी जागांवर आघाडी मिळाली आहे. शहरी भागातील मतदारांनी दाखवलेला विश्वास हे भाजपाच्या हरियाणामधीाल विजयाचं महत्त्वाचं कारण ठरलं आहे.
( नक्की वाचा : निवडणूक निकाल 2024 LIVE Updates : हरियाणात भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार? जाणून घ्या आताचे कल )
ग्रामीण मतदारसंघांमध्ये भाजपाकडं सध्या 28 जागांवर आघाडी आहे. यापूर्वी भाजपाकडं 19 जागा होत्या. तर काँग्रेसला 24 जागांवर आघाडी आहे. शहरी मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि ग्रामीण भागात सुधारलेली कामगिरी या जोरावर भाजपानं हरियणा विधानसभेत स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरु केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world