
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या ठिकाणालाच दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. या हल्ल्यातला एक व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये पीडित महिला माझ्या नवऱ्याला वाचवा, अशी विनंती दहशतवाद्यांना करत आहे. त्याचबरोबर ही घटना कशी घडली याची देखील माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घटनास्थळाचे भीतीदायक दृश्य
पहलगाममधील घटनास्थळावरुन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ' ती महिला प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा,' अशी विनंती करत आहे. त्या महिलेनं सांगितलं आम्ही इथं भेळपूरी खात होतो. माझा नवरा बाजूला उभा होता. तितक्यात एक व्यक्ती आला आणि त्यानं माझ्या नवऱ्याला गोळी मारली.
या महिलेसोबत आणखी एक महिला दिसत आहे. त्या महिलेच्या चेहऱ्यावर रक्त आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीकडे ती असहायपणे पाहत आहे. तिथे एक मुलगा देखील आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती त्याला म्हणतो की बेटा, काळजी करू नकोस.
( नक्की वाचा : Pahalgam attack: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पर्यटकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू, अमित शाह श्रीनगरला रवाना )
या व्हिडिओमध्ये काही जखमी व्यक्ती जमिनीवर पडल्याचं देखील दिसत आहे. एका व्यक्तीचे कपडे फाटले असून तो जमिनीवर पडलाय. लाल रंगाचा ड्रेस घातलेली महिला, कृपया माझ्या नवऱ्याला वाचवा, अशी विनंती करत असल्याचं ऐकू येत आहे.
त्याचबरोबर एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. त्याचे कपडे रक्ताने माखले आहेत. या व्यक्तीसोबत उभी असलेली महिला मदतीसाठी याचना करत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने त्याला पाणी प्यायचे आहे का असे विचारले. तो त्या व्यक्तीला बाटलीतून पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आणखी काही जखमी लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world