
India Pakistan Match: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील लढत रविवारी (14 सप्टेंबर ) दुबईमध्ये होणार आहे. या मॅचवरुन भाजपा आणि पक्षांच्या निशाण्यावर आहेत. सोशल मीडियावरही या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहन फॅन्सकडून केलं जात आहे. त्याचवेळी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
BCCI त्या 26 कुटुंबांना विसरली...
ऐशान्या द्विवेदी यांनी सांगितलं की, 'बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. मला वाटते की बीसीसीआय त्या 26 कुटुंबांबद्दल संवेदनशील नाही. त्यांनी पहलगाम हल्ल्यातील आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या हानीला विसरून गेले आहेत. मला आमच्या क्रिकेटपटूंनाही विचारायचे आहे की ते असे का करत आहेत? ते पाकिस्तान क्रिकेट टीमबरोबर खेळायला का तयार झाले आहेत?'
( नक्की वाचा : Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले )
क्रिकेटपटू निषेध का करत नाहीत?
ऐशान्या यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या की, 'क्रिकेटपटू देशभक्त असतात असे म्हटले जाते. याच देशप्रेमामुळे राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट बघायला आणि खेळायला पसंत करतात. पण 1-2 क्रिकेटपटू सोडून, कुणीही पुढे येऊन हे म्हटले नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. बीसीसीआय त्यांना बंदूक दाखवून खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी आपल्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. पण ते असे करत नाहीत. मला सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारायचे आहे की त्या 26 कुटुंबांबद्दल त्यांचे काही कर्तव्य नाही का? '
पाकिस्तान 'या' पैशांचं काय करेल?
पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कृतीचा उल्लेख करत ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या, 'सामन्यातून मिळालेल्या पैशांचा पाकिस्तानात काय वापर होईल? यात कोणतीही शंका नाही की पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे पुरवाल आणि ते त्याचा वापर पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी करतील. हे मला समजले आहे, पण लोकांना हे समजत नाहीये त्यामुळे मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करते. तुम्ही तो बघायला जाऊ नका. तसंच हा सामना पाहण्यासाठी तुमच्या घरातील टीव्ही देखील चालू करु नका.'
#WATCH | Kanpur, UP: On upcoming India vs Pakistan match in Asia Cup 2025, Aishanya Dwivedi - wife of Pahalgam terror attack victim Shubham Dwivedi, says, "BCCI should not have accepted a match between India and Pakistan...I think BCCI is not sentimental towards those 26… pic.twitter.com/1tAu9wjqSo
— ANI (@ANI) September 13, 2025
' पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटले होते की, आपण पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही. आपण त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आपण त्यांच्या भूमीवर सामना खेळायला जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंना आपल्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही.
पण, बीसीसीआयने याचाही मार्ग काढला. एशिया कप 2025 चा हा सामना दुबईमध्ये ठेवला आहे. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, भारत पाकिस्तानसोबत थेट खेळत नाहीये. भारत तर एशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयलाही आवाहन केले होते की, पाकिस्तानसोबत हा सामना खेळू नका. पण मला वाटते की माझी गोष्ट बीसीसीआयपर्यंत पोहोचली नाही, ' अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world