जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्र, गुजराजसह अनेक राज्यांचे पर्यटक होते. या हल्ल्यानंतर सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या हल्ल्यानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहमंत्र्यांना श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
Live Update : हशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जण मृत्यू पावले आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे हे आपल्या कुटुंबांसह फिरायला गेले होते. यात कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पुण्यातील रास्ता पेठेतील घराजवळ शोकाकुल वातावरण झाले आहे
Live Update : पहलगाममधील हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद
पहलगाममधील हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद
लष्कर ए तोयबानं पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली
हल्ल्याचा डाव सीमेपलीकडे रचल्याची सूत्रांची माहिती
Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून मृतांना श्रद्धांजली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून मृतांना श्रद्धांजली, पर्यटकांचं शाहांकडून सांत्वन, तर थोड्याच वेळात घटनास्थळाची पाहणी करणार.
Live Update : पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू...
पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू...
Live Update : जम्मू-काश्मीर स्थानिक आक्रमक, भ्याड हल्ल्याचा केला निषेध
जम्मू-काश्मीर स्थानिक आक्रमक, भ्याड हल्ल्याचा केला निषेध
Live Update : जम्मू-काश्मीर पहलगाममधील हल्ल्यात महाराष्ट्रातील 26 जणं जखमी
यादीतील 26 जखमी व्यक्तींची नावे आणि त्यांची शहरे खालीलप्रमाणे
* माणिक पाटील - पुणे
* सुबोध पाटील - मुंबई
* एस. भालेराव - पुणे
* आसवाज जगदाळे - पुणे
* प्रगती जगदाळे - पुणे
* संतोष जगदाळे - पुणे
* कौस्तुभ गंभोळे - पुणे
* नेहा तुषार वाघचौरे - जळगाव
* दिलीप जयराम ढसाळे - रायगड
* अतुल श्रीकांत मोने - ठाणे
* हेमंत सुहास लेले - ठाणे
* संजय लक्ष्मण लेले - ठाणे
* अनुष्का अतुल मोने - ठाणे
* रुचा अतुल मोने - ठाणे
* मोनिका हेमंत जोशी - ठाणे
* ध्रुव हेमंत जोशी - ठाणे
* कविता संजय लेले - ठाणे
* हर्षाली संजय लेले - ठाणे
* शोभीत पटेल - मुंबई
* सिमरन रुपचंदानी - नागपूर
* तिलक रुपचंदानी - नागपूर
* गौरव रुपचंदानी - नागपूर
* संदीप ज्ञानेश्वर साबळे - जालना
* तेजस्विनी संदीप साबळे - जालना
* कौस्तुभ संदीप साबळे - जालना
* अनन्या अरविंद आवळे - भंडारा
Live Update : काश्मीरच्या पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेले नागपूरचे रहिवासी बचावले
काश्मीरच्या पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेले नागपूरचे रहिवासी तिलक रुपचंदानी, सिमरन रुपचंदानी आणि गर्व रुपचंदानी बचावले आहेत.
Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे कोल्हापूरचे 16 पर्यटक अडकले
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे कोल्हापूरचे 16 पर्यटक अडकले
हे पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती
ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेले असल्याने रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याची पर्यटकांकडून माहिती
विमानाचे दरही वाढल्याची माहिती
ढगफुटीमुळे अडकलेले पर्यटक गुरुवारपर्यंत विमानाने गोव्यात येतील अशी प्राथमिक माहिती
Live Update : पहलगममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू
Pahalgam Terrorist Attack Live Update : पहलगममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू
Live Update : संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी 6 वाजता आणणार
Live Update : जम्मू आणि काश्मीरमध्ये कोल्हापूर आणि बेळगावमधील 200 हून जास्त पर्यटक अडकले
जम्मू आणि काश्मीरमध्ये कोल्हापूर आणि बेळगावमधील २०० हून जास्त पर्यटक अडकल्याची माहिती
Live Update : पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिकांची घेतली मदत
पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिकांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची माहिती आहे.
Live Update : पहलगाममधील हल्ल्यानंतर निषेध रॅली, स्थानिकांनी व्यक्त केला घटनेचा निषेध
पहलगाममधील हल्ल्यानंतर निषेध रॅली, स्थानिकांनी व्यक्त केला घटनेचा निषेध
Live Update : सुरक्षेचे पोकळ दावे सरकारने करु नये, राहुल गांधींची टीका
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी, तर राहुल गांधी यांनी अमित शाहांना फोन करुन घेतली हल्ल्याची माहिती.
Live Update : महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेले पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष विमानाने परत आणणार
Live Update : पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल
दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात, विमानतळावरच मोदींची अजित डोवाल, एस जयशंकर यांच्यासोबत बैठक, मोठ्या शहरांमध्ये हायअर्लट जारी