जाहिरात

Pakistan Firing : पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले. सर्व व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली.

Pakistan Firing : पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, नियंत्रण रेषेवर भारतीय चौक्यांवर गोळीबार

India Vs Pakistan : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (LOC) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे.  पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला, परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

भारताची कारवाई, पाकिस्तानचा तिळपापड

पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले. सर्व व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. यासोबतच, सिंधू जल करारांतर्गत दिलेला पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न युद्ध पुकारण्यासारखा मानला जाईल, असेही पाकिस्तानने म्हटलं आहे.

नक्की वाचा - Pahalgam Terror Attack : आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव

Latest and Breaking News on NDTV

पाकिस्तानने सीमेवर सुरक्षा वाढवली

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने राजस्थानच्या अगदी समोरील आंतरराष्ट्रीय सीमेवर आपल्या सैनिकांची तैनाती वाढवली आहे. हा भाग बहावलपूरचा आहे, जिथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य मुख्यालय आहे. पाकिस्तानी लष्कराने 31 व्या कोअरचे लेफ्टनंट जनरल साकिब महमूद मलिक यांना याबाबत थेट सूचना दिल्या आहेत. जैशच्या मदरशाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी येथे हवाई संरक्षण आणि रडार सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानने वाघा बॉर्डर क्रॉसिंग देखील बंद केली. सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम (SVES) अंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आणि भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना निघून जाण्यास सांगितले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या घोषणा करण्यात आल्या. 

( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार )

भारताने पाकिस्तानचं पाणी रोखलं

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने बुधवारी 1960 मधील सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. भारताने सिंधु पाणी करार स्थगित करणे,  पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.