टोल मागितला म्हणून जेसीबी चालकाने टोल बुथची तोडफोड केली आहे. जेसीबी मधोमध लावून टोल बुथ चालकाने हे कृत्य केलं आहे. उत्तर प्रदेशामधील दिल्ली-लखनौ महामार्गावरील हापूर येथील ही घटना आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेली नाही.
टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जेसीबी चालकाना टोल भरण्यास सांगितले. टोल नाक्यावर जेसीबीचा रस्ता देखील अडवण्यात आला होता. मात्र जेसीबी चालकाने टोलचे पैसे न देता तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा- VIRAL VIDEO: अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा, टोल कर्मचारी मेटाकुटीस)
अखेर संतापलेल्या चालकाने जेसीबीच्या साहाय्याने टोल नाक्यावरील पोल तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये टोल बुथचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकांचा शोध घेत आहेत.
(नक्की वाचा: Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे)
मागील आठवड्यात देखील हापूर टोल नाक्यावर एका कार चालकाने टोल देण्यास नकार दिला होता. टोल कर्मचाऱ्यांनी टोल भरण्याची सक्ती केल्याने त्याने एका कर्मचाऱ्याला कारने उडवलं होतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती.