जाहिरात

Kailash Mansarovar Yatra : 5 वर्षांनंतर आजपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, खर्च किती; काय आहे नोंदणीची प्रक्रिया? 

कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) आज म्हणजेच 30 जून 2025 पासून सुरुवात होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ही यात्रा सुरू होत आहे.

Kailash Mansarovar Yatra : 5 वर्षांनंतर आजपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, खर्च किती; काय आहे नोंदणीची प्रक्रिया? 

कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) आज म्हणजेच 30 जून 2025 पासून सुरुवात होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ही यात्रा सुरू होत आहे. कैलास मानसरोवर हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्मियांसाठी पवित्र स्थळ आहे. ही यात्रा जगभरातील सर्वात अवघड यात्रेंपैकी एक आहे. दरवर्षी 750 भाविकांना कैलास मानसरोवर प्रवासाची परवानगी मिळते. या यात्रेबद्दल जाणून घेऊया..


कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग...(Kailash Mansarovar Yatra route)


कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग भारतातील उत्तराखंड आणि सिक्कीममधून जातो. पहिला मार्ग उत्तराखंडमधील लिपुलेख आणि दुसरा सिक्कीमच्या नाथुला पासमधून जातो. सिक्कीमहून जाणारे भाविक कैलास मानसरोवर भवनातून बसमधून दिल्ली एअरपोर्टला जातात. तेथून ते गंगटोकला जातात आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. लिपुलेखच्या मार्गावरुन येणारे प्रवासी बसमधून उत्तराखंडला येतात आणि पुढचा प्रवास सुरू करतात. 


यात्रा सुरू करण्यापूर्वी आरोग्य तपासणी... (Health check-up before starting Kailash Yatra)


कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यापूर्वी भाविकांना चार ते पाच दिवस कैलास मानसरोवर भवनात थांबावं लागतं. येथून त्यांना दिल्लीच्या हार्ट अँड लंग्स इन्स्टिट्यूटमधून आरोग्य तपासणी करावी लागते. जे यात्री फिट असतात त्यांना यात्रेला पुढे जाण्याची परवानगी मिळते. कैलास मानसरोवर यात्रेबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती दिली जाते. कैलास मानसरोवर यात्रा अत्यंत उंचावर असते. यासाठी तुम्हाला 19,500 फूट उंचीवर ट्रेकिंग करावी लागते. 

July Month Festival Calender: आषाढी एकादशी, गुरुपोर्णिमा ते श्रावण मास.. जुलै महिन्यातील सणांची संपूर्ण यादी

नक्की वाचा - July Month Festival Calender: आषाढी एकादशी, गुरुपोर्णिमा ते श्रावण मास.. जुलै महिन्यातील सणांची संपूर्ण यादी


कैलास मानसरोवर यात्रेसाठी खर्च...(Expenses for Kailash Mansarovar Yatra)


कैलास मानसरोवर यात्रेसाठी साधारण दोन ते तीन लाखांपर्यंत खर्च येतो. ज्यात फिटनेस टेस्ट, चीन व्हिसा, इमिग्रेशन शुल्क, घोड्याचे शुल्क, जेवण, सामानाची ने-आण करण्यासाठीचे शुल्क, मानसरोवर आणि मंदिरातील प्रवेश तिकीटसह तिबेटमध्ये राहण्याचं भाडं यांचा समावेश आहे. याशिवाय तिबेटमध्ये जेवण, कपडे, फूट स्टोअर, फिरणं आणि अन्य खर्च वेगळा धरावा लागेल. 


रजिस्ट्रेशन कसं होतं? (How is the registration for Kailash Mansarovar Yatra )


कैलास मानसरोवर यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावं लागतं. यासाठी एक पासपोर्ट साइज फोटो, पासपोर्टचं पहिलं आणि शेवटचं पान, फोटो, फोन नंबर आणि ईमेल आवश्यक असतं. 

कैलास मानसरोवर यात्रा किती दिवसात पूर्ण होते?


कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी 22 दिवस लागतात. ज्यातील 14 दिवस आपण भारतात आणि आठ दिवस तिबेटमध्ये असतो. या यात्रेत सुरक्षेची जबाबदारी तिबेट सीमा पोलिसांची असते. कैलास मानसरोवर यात्रा 4,600 मीटर उंच तारबोचे खोऱ्यापासून सुरू होते. यादरम्यान, कैलास पर्वताची प्रदक्षिणा करावी लागते. ज्यामध्ये 52-55 किलोमीटर चालावे लागते. ही यात्रा 3 दिवसांत पूर्ण होते. प्रवासादरम्यान, सरोवराची प्रदक्षिणा देखील करावी लागते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com